आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात चाललेला 100 क्विंटल तांदूळ जप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्वस्त धान्य दुकानातील 100 क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना पकडण्यात आला. सुमारे 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.
माळीवाड्यातील बारातोटी कारंजा येथील स्वस्त धान्य दुकानासमोर रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मिळताच अन्नधान्य वितरण अधिकारी व पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या विशेष पथकाने छापा टाक ला. मालट्रकमध्ये (एमएच 4 एफ 9121) प्रत्येकी 50 किलो वजनाच्या सुमारे 200 गोण्या तांदूळ होता.
याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी रवींद्र बावा यांच्या फिर्यादीवरून सुरेश बबन रासकर (नगर) व धोंडिबा विश्वंभर गोसावी (खांडगाव, ता. श्रीगोंदा) यांच्याविरोधात रविवारी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रासकर याला अटक करण्यात आली आहे.