आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा वाळूचोरीप्रकरणी 9 वाहनचालकांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे मंगळवारी रात्री बेकायदा साठवून ठेवलेल्या वाळूची चोरून वाहतूक करणार्‍या नऊ वाहनचालकांना अटक करण्यात आली. या कारवाईत पाऊणकोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस निरीक्षक अशोक रजपूत, उपनिरीक्षक महावीर परमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने शेरी चिखलठाण शिवारात ही कारवाई केली. जप्त केलेली वाहने तहसील आवारात लावण्यात आली आहेत. पोलिस नाईक मधुकर सुरवसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

राहुरी पोलिसांनी या कारवाईत 21 ब्रास वाळूसह 9 वाहने असा पाऊण कोटी रुपयांचा ऐवज जप्त करून वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत उत्तम खामकर(मांडवे खुर्द, ता. पारनेर), संदीप कोळेकर (साकूर, ता. संगमनेर), कृष्णा काकडे (शेरी, ता. राहुरी), शांताराम शिंदे (टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, योगेश खेमनर, गीताराम सोन्नर (दोघेही साकूर), राजकुमार वर्मा व विश्वंभर शिंदे (दोघेही उल्हासनगर, जि. ठाणे) यांना अटक केली आहे. पुढील तपास ए. आर. कोरडे करीत आहेत. यापूर्वीही या ठिकाणावर वाळूवरून मोठा संघर्ष झाला होता.