आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पथकांना हुलकावणी देत शहरातून वाळू वाहतूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली महसूल, पोलिस आरटीआे विभागाच्या पथकांत समन्वयाचा अभाव असल्याने चोरट्या मार्गाने वाळूउपसा सुरूच अाहे. वाळू चोरीमुळे महसूल विभागाचा दररोज कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. पोलिस आरटीआेची पथके शहरात जाणाऱ्या वाळू वाहनांची तपासणी करतात. या पथकांना हुलकावणी देण्यासाठी वाळूची वाहतूक शहरांतर्गत रस्त्यावरुन होत असल्याने या रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
कमी वेळात जास्त पैसे मिळत असल्याने ग्रामीण भागात वाळूचोरीचा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून तेजीत आहे. वाळूचोरीतून मिळणाऱ्या अमाप पैशांतून राजकारण राजकारणातून वाळूचोरी या समीकरणामुळे या व्यवसायाला मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे. राजकीय प्रशासकीय राजाश्रयामुळे ग्रामीण भागातील युवक या धंद्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत.
नगर जिल्ह्यातून वाळूचोरी करुन त्याची शेजारच्या पुणे, आैरंगाबाद या जिल्ह्यात विक्री केली जाते. झटपट श्रीमंत होण्याच्या या व्यवसायातून जिल्ह्यात अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. वाळूचोरीतून जास्त पैसे मिळत असल्याने या व्यवसायात अडकलेला युवकवर्ग व्यसनाधीन झाला आहे. यापूर्वी वाळूचा उपसा रात्रीच्या वेळी होत होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून दिवसादेखील वाळूची चोरी होत आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन वाळू लिलावांमुळे वाळूचोरांचे आणखी फावले आहे. यापूर्वी बोली पध्दतीने वाळूचे लिलाव होत असत. या प्रक्रियेत जास्त वेळ जात होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन वाळू लिलाव घेण्यात येत आहेत. प्रशासनाने निश्चित केलेल्या वाळूसाठ्यांसाठी मोठी अनामत रक्कम भरावी लागत असल्यामुळे, तसेच काही किचकट कागदपत्रे द्यावी लागत असल्यामुळे ऑनलाईन लिलावांना कमी प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन लावापेक्षा वाळूचोरी बरी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून वाळूचोरी दुपटीने वाढली.
वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल, पोलिस उपप्रादेशिक परिवहन विभागाची स्वतंत्र पथके आहेत. मात्र, या पथकांमध्ये समन्वयाचा अभाव अाहे. ही पथके शेंडी, देहरे कल्याण रस्त्यावर वाहनांची तपासणी करतात. आैरंगाबादहून नगरकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी शेंडी बाह्यवळण रस्त्यावर होते. प्रामुख्याने नेवासे तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी वाळूउपसा करुन त्याची वाहतूक नगर-आैरंगाबाद रस्त्याने होते. मात्र, अनेकदा पथक तेथेे उपस्थित नसते. त्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक शॉर्टकर्ट म्हणून तपोवन रस्ता आणि पाइपलाइन रस्त्याने जातात. राहुरी येथील मुळा नदीपात्रातून उपसा केलेली वाळू घेऊन नगर-मनमाड रस्त्याने वाळूची वाहने येतात. देहरे येथेही अनेकदा पथके नसतात. त्यामुळे ही वाहने बाह्यवळण रस्त्याने जातात. वाळूच्या वाहनांमुळे या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
पावसामुळे जिल्ह्यातील काही नदीपात्रांमध्ये सध्या पाणी असले, तरी आेल्या वाळूचा उपसा करुन त्याची पाचपट जास्त दराने विक्री केली जात आहे. या चोरट्या मार्गाने सुरु असलेल्या वाळूचोरीमुळे महसूल प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

नगर जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत चोरट्या मार्गाने वाळूउपसा करणाऱ्यांकडून महसूल विभागाने कोटी ३४ लाखांचा दंड वसूल केला. पोलिस विभागाने वाळू चोरणाऱ्या ४० जणांवर, तर उपप्रादेशिक परिवहन विभागाने १५३ जणांविरुध्द कारवाई केली. अन्य गौण खनिजाच्या चोरीतून कोटीचा दंड वसूल करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पोलिसांच्या तुलनेत कमी मनुष्यबळ आहे, तरी त्यांची कारवाई जास्त प्रमाणात आहे.
अवैध वाळू वाहतुकीमुळे तपोवन रस्त्याची अवस्था अशी झाली आहे.

सप्टेंबरपासून २७१ साठ्यांचे लिलाव
प्रशासनाने २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये लिलावासाठी १७९ वाळूसाठे निश्चित केले होते. पण त्यापैकी केवळ २५ साठ्यांचे लिलाव झाले. उर्वरित १५३ साठ्यांचे लिलावच झाले नाहीत. यंदा वाळूसाठ्यांची संख्या ११५ ने कमी करण्यात आली आहे. २०१५-१६ वर्षासाठी ५४ वाळूसाठे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी केवळ १७ साठ्यांचे लिलाव झाले. या लिलावातून प्रशासनाला कोटी ६९ लाखांचा महसूल मिळाला. यंदाची वाळूलिलावाची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. २७१ वाळूसाठ्यांचे लिलाव होणार आहेत. ऑक्टोबरपासून वाळूसाठे दिले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...