आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनधिकृत शाळांवर होणार कारवाई; जि. प. स्थायी समितीच्या सभेत आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक व माध्यमिक शाळांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत गुरुवारी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यास सहमती दर्शवून नियमानुसार कारवाईचे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, सदस्य बाळासाहेब हराळ, सुवर्णा निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

हराळ यांनी अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित केला. या शाळांवर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आहे का, असा सवाल करून संबंधित शाळाचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी प्राथमिकच्या केवळ तीन अनधिकृत शाळा आढळल्याचे सांगितले. शिक्षण उपसंचालकांकडे अहवाल पाठवून कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे नवाल यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 301 गावे निवडून आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन ते पाच लाखांपर्यंत तरतूद करण्याचे सभेत ठरले.

शेवगाव, पारनेर, अकोले, कर्जत, जामखेड, नेवासे या तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. तेथे नगरपालिका करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.