आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर येथे गावठी पिस्तुलासह २ अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेले दोघे पोलिसांच्या सापळ्यात अडकले. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नांत त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. दोघांना कट्ट्यासह अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. कट्टा विकत घेण्यासाठी आलेला मात्र पसार झाला.
प्रेम पांडुरंग चव्हाण (वय ३२, मोरगेवस्ती), भारत ऊर्फ सोन्या मनोहर चावरे (२३, दत्तनगर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे व एमएच १५ एएल ६१९१ या क्रमांकाची पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली.

पोलिस उपाधीक्षक राकेश ओला यांना चव्हाण व चावरे हे गावठी पिस्तुलांची विक्री करतात, अशी खबर मिळाली होती. त्यामुळे दोघांवर आठ दिवसांपासून पोलिसांनी लक्ष ठेवले होते. राहुरी येथील एका तरुणाला ते गावठी पिस्तूल विकणार असल्याचे समजले. त्यांच्या मोबाइलवरील संभाषणावरुन पोलिसांना खरेदी विक्रीचा ठावठिकाणा कळाला.
बेलापूर-उक्कलगाव रस्त्यावरील मेहेत्रे वस्तीजवळ चव्हाण व चावरेे पल्सर मोटारसायकलवर आले. राहुरी भागातील तरुण पिस्तूल खरेदीसाठी आला. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळंदे, हवालदार दादासाहेब लोंढे, कर्मचारी प्रसाद साळवे, सूरज गायकवाड, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, अमोल भोईटे, दीपक जाधव यांनी तेथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तिघे पळू लागले. यावेळी चव्हाण व चावरे याने पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पकडण्यात आले. पिस्तूल खरेदी करण्यासाठी आलेला राहुरी भागातील तरुण मात्र फरार झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हवालदार लोंढे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील करत आहेत