आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लॉरेन्स’च निघाला खंडणीखोर टोळीचा ‘स्वामी’, सूत्रधार लॉरेन्स स्वामीसह ठेकेदारही आरोपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-सोलापूर रस्त्यावर टोलनाक्यांवर ट्रकचालकांकडून सक्तीची खंडणीवसुली करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स स्वामी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लॉरेन्स स्वामी टोलनाक्यावरील ठेकेदार जयंत खळदकर यांनाही आरोपी केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अटकेत असलेल्या ११ आरोपींचे जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत. तर गुन्ह्यात नाव आल्यापासून स्वामी खळदकर गायब झाले आहेत. 
 
नगर सोलापूर रस्त्यावर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पथकर वसुली नाका आहे. या नाक्यावर ट्रकचालकांना ६० रुपयांचा कर द्यावा लागतो. मात्र वसुलीसाठी ठेकेदाराने नेमलेल्या युवकांच्या टोळ्या पावत्या देता ट्रकचालकांकडून जादा रकमेची वसुली करतात. अनेकदा पावती देऊनही अधिक रक्कम वसूल केली जाते. याबाबत काही ट्रकचालकांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत छापा टाकून कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सप्टेंबरला मध्यरात्री टोलनाक्यावर छापा टाकला. 
 
नगरहून सोलापूरला जाणाऱ्या वाहनांकडून, तसेच सोलापूरहून नगरकडे येणाऱ्या वाहनांकडून करवसुली करणाऱ्या नाक्यावर पोलिस जाऊन थांबले. काही ट्रकचालकांकडे त्यांनी चौकशी करुन पावत्यांची विचारणा केली. वसुली करणारे गुंड बळजबरीने अधिक रकमेची वसुली करत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही नाक्यांवर असलेल्या एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांची झडती घेतली असता प्रत्येकाकडे पथकर वसुलीच्या पावत्या ५२ हजार ४०० रुपयांची रोकड मिळाली. याबाबतही युवकांनी व्यवस्थित माहिती दिली नाही. 
 
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बळजबरीने खंडणी वसूल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पोलिस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार सुधीर पाटील एक पथक या गुन्ह्याचा कसून तपास करत आहे. सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींनी पोलिस चौकशीत आपण लॉरेन्स स्वामीकरिता खंडणी वसूल करत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी स्वामीलाही आरोपींमध्ये समाविष्ट केले अाहे. मात्र, टोलनाक्यावर छापा पडल्यापासून स्वामी गायब झाला असून एलसीबीचे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. स्वामी खळदकर यांच्याशिवाय या गुन्ह्यात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, खंडणीचे रॅकेट किती खोलवर रुजलेले आहे, याचाही पोलिस तपास करीत आहेत. 
 
कोण आहे स्वामी? 
लॉरेन्सस्वामी हा काही वर्षांपासून रिपाइंचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे. शहरात त्याची हॉटेल्सही आहेत. त्याच्या हॉटेलात रिपाइंच्या पत्रकार परिषदा होतात. त्याचे सोशल नेटवर्क मोठे असून जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा तो प्रेसिडेंट आहे. भिंगारमध्ये त्याचा ‘लॉरेन्स फुटबॉल क्लब’आहे. दरवर्षी तो राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करताे. या स्पर्धेला अनेक मान्यवर हजेरी लावतात. टोलनाक्यावर खंडणी वसुली करणाऱ्या पोरांची देखरेख तोच पाहतो, असे चौकशीत समोर आले. त्यामुळे पोलिस त्याच्या इतर ‘उद्योगां’चीही कसून चौकशी करीत आहेत. 
 
हे आहेत आरोपी 
विजयशिवाजी चव्हाण (पारोळा, जळगाव), अजय दिलीप कोळी (शिरपूर, धुळे), संदीप रघुनाथ भोसले (दरेवाडी, नगर), अजय आचा स्वामी (इराणी रोड, भिंगार), मंगेश युवराज ओव्हळ (करमाळा, सोलापूर), पंकज राजू गवळी (गवळीवाडा, भिंगार), वाहिद लाला शेख (सैनिकनगर, भिंगार), अनिल अंबादास अळकुटे (वडारवाडी, भिंगार), सागर राजू परदेशी (घासगल्ली, भिंगार), राजेंद्र जयसिंग गोरे (रुईछत्तीशी, नगर), शुभम प्रताप लाहोट (माधवबाग, भिंगार). आता लॉरेन्स स्वामी ठकेदार जयंत खळदकर यांनाही आरोपी करण्यात आले. आहे. 
 
स्वामीसह दोघे आरोपी 
सोलापूर रोडवरील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या टोलनाक्यावर खंडणी वसुली होत असल्याचे पोलिसांच्या छाप्यात निष्पन्न झालेले आहे. सुरुवातीला आम्ही ११ जणांना पकडले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा सूत्रधार लॉरेन्स स्वामी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच हा टोलनाका ज्या ठेकेदाराने चालवायला घेतला, त्याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लॉरेन्स स्वामी ठेकेदार जयंत खळदकर यांनाही आरोपी केले आहे. आता पोलिस त्यांच्या मागावर आहेत.  
- दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, एलसीबी 
बातम्या आणखी आहेत...