आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता बाजार समितीत भुसार शेतमालाचे तत्काळ ऑनलाइन पेमेंट, देशभरात पहिला मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांच्या भुसार मालाला तत्काळ ऑनलाइन पेमेंट सुविधेचा प्रारंभ केंद्र सरकारचे कृषी सहकार विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ. हुसेन दलवाई यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. माल विकताक्षणी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणारी ही देशातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे. 
 
केंद्रीय पणन सहसचिव डॉ. अलका भार्गव, राज्याचे कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, स्पर्धात्मक कृषी प्रकल्पाचे राजेंद्रकुमार दराडे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, सचिव उध्दव देवकर, संचालक सखाहरी सदाफळ, शरद मते, अनिल गमे, चंद्रभान बावके, भाऊसाहेब जेजूरकर यावेळी उपस्थित होते. डॉ. दलवाई म्हणाले, दोन वर्षांपूर्वीच राहाता बाजार समितीने ऑनलाइन भुसार शेतीमालाचा लिलाव पध्दतीचा प्रारंभ केला असून शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सुविधा देऊन दिली आहे. शेतीमालाचे व्यापाऱ्याकडे वजन होताच पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर तत्काळ ऑनलाइन जमा होणार असल्यामुळे यापुढे व्यापाऱ्यांच्या दारात खेटा माराव्या लागणार नाहीत.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीने नेत्रदीपक कामगिरी बजावून राज्यात अव्वल दर्जा मिळवला होता. आता हा लौकिक देशभर झाला आहे. 

शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय 
राहाताबाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांना न्याय दिला आहे. कांदा डाळिंबाच्या विक्रीसाठी महत्त्वाची बाजार समिती म्हणून राहाता बाजार समितीचा गौरव झाला आहे. आता तत्काळ ऑनलाइन पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणारी ही देशातील पहिली बाजार समिती ठरली आहे. 
- उद्धव देवकर ,सचिव, राहाता बाजार समिती. 
बातम्या आणखी आहेत...