आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imposed 35 Thousand Fine To New Arts For Cutting Trees

वृक्षतोडीबद्दल न्यू आर्ट‌्सला ३५ हजार दंड, नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यास यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: न्यू आर्ट‌्स महाविद्यालयाच्या आवारात अशा प्रकारे वृक्षतोड करण्यात आली होती.
नगर - न्यू आर्ट‌्स महाविद्यालयाने काही दिवसांपूर्वी आपल्या बाॅटनिकल गार्डनमधील सात वृक्ष तोडले होते. याप्रकरणी या महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने लावून धरली होती. कारवाई झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनविसेने दिला होता. अखेर महापालिकेने महाविद्यालयाला वृक्षतोडप्रकरणी ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. मनविसेच्या पाठपुराव्यास यश आले असल्याचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी सांगितले.

न्यू अार्टस् महाविद्यालयाने काही दिवसांपूर्वी कोणतीही परवानगी घेता बाॅटनिकल गार्डनमधील सात मोठे वृक्ष तोडले. हा प्रकार उघड होताच मनविसेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. महापालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश भाेसले यांनीदेखील तोडलेल्या वृक्षांची पाहणी करून महाविद्यालयाच्या विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित मनपा कर्मचाऱ्यांना दिले होते. मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त विलास ढगे यांच्याकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. अखेर कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता महापालिकेने महाविद्यालयाच्या विरोधात कारवाई केली. तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा करून महाविद्यालयाला रीतसर नाेटीस बजावण्यात आली होती. महाविद्यालयाने अापली चूक कबूल करत महापालिकेकडे ३५ हजार रुपयांचा दंड भरला. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात २५ ते ३० वर्षे जुनी वृक्ष तोडली, तर पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे वृक्षतोडीचे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी न्यू आर्ट‌्ससारख्या महाविद्यालयाच्या विरोधात कारवाई होणे गरजेचे होते. त्यासाठी आम्ही वेळाेवेळी पाठपुरावा केला. आमच्या पाठपुराव्यास यश अाले, अशी माहिती पुरोहित यांनी दिली.