आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएमएस व्हिडिओकॉनच्या विद्यार्थिनींचे रविवारी अरंगेत्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरच्या तीन उभरत्या नृत्यांगनांचे अरंगेत्रम पाहण्याची संधी नगरकरांना येत्या रविवारी (20 जानेवारी) मिळणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे.

डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएस व्हिडिओकॉन अँकॅडमी ऑफ फाईन अँण्ड परफॉर्मिंग आर्टस्मध्ये भरतनाट्यम्चे शिक्षण घेतलेल्या वर्षा पंडित, अश्विनी भोरे व कविता भांबरे यांचे अरंगेत्रम रविवारी होणार आहे. अरंगेत्रम म्हणजे रंगमंचावरील पहिले पाऊल. हे पाऊल टाकून विद्यार्थिनी नृत्यशिक्षणातील पुढील वाटचाल सुरू करतात. या तिघींनी कल्याणी प्रधान व माधवी सराफ यांच्याकडून भरतनाट्यम्चे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. या तिघींनी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात नृत्य सादर केले आहे. आठ वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्या पहिलाच जाहीर कार्यक्रम सादर करणार आहेत. नृत्यरचना व मार्गदर्शन माधवी सराफ-रावल यांचे आहे.या कार्यक्रमासाठी व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत, कायदेशीर सल्लागार शरद पल्लोड, संस्थेचे सचिव फिलीप बार्नबस यांचे सहकार्य मिळाले आहे. प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना व पुण्यातील नूपुर नाद डान्स अकादमीच्या संचालिका स्वाती दैठणकर व सूरदास संगीत विद्यालयाचे संस्थापक पंडित रघुनाथ केसकर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते व संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी दिली.