आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीत आजपासून कृषी प्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदर्शनात निवडण्यात आलेला शेतीतंत्रज्ञानाचा आधुनिक प्लॉट
नगर - अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृ़षी विज्ञान केंद्र बारामती येथे ते नोव्हेंबरदरम्यान कृषी प्रात्यक्षिके आधारित कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी आत्मा, नाबार्ड राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनाचा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या ११० एकर क्षेत्रावर १० गुंठ्यांच्या ९० प्लॉटवर कृषी विषयक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान दाखवण्यात आले आहे. यात भाजीपाला लागवड, पशुपक्षी व्यवस्थापन, स्वयंचलित खत देणारी प्रणाली, चारा पिके, पॉलीहाऊस, फळप्रक्रिया, बीजप्रक्रिया, कृषी पर्यटन, शेततळी, पाणी देण्याची विविध पद्धती येथे एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनात सुमारे ३०० कंपन्यांचे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत. या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नोव्हेंबर रोजी शेतकरी उत्पादक कंपनी, नोव्हेंबर रोजी उच्च तंत्रज्ञान अाधारित भाजीपाला उत्पादन नोव्हेंबर रोजी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...