आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात म्हाळादेवी (ता. अकोले) येथील दोन मुले जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. तन्मय हासे आणि ऋषल शिवाजी हासे अशी त्यांची नावे असून ऋषलची प्रकृती चिंताजनक आहे.

बिबट्याने बुधवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात तन्मय अंकुश हासे (वय ११)जखमी झाला. कारवाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ हा हल्ला झाला. उपचारानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. अशीच दुसरी घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. ऋषल हासे (वय १५) हा म्हाळादेवी शिवारात वनदेवाजवळ शेतात काम करत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. ऋषल मोठ्याने ओरडल्याने आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले. त्यांनी बिबट्याला हुसकावले. जखमी रूषलला रुग्णालयात दाखल केले.मानेतून मोठा रक्तस्राव झाल्याने त्याला आधी अकोले येथे आणि नंतर संगमनेर येथील डॉ. नितीन जठार यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.