आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीमध्ये जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा, पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाल्याचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वाची ओळख राज्याला करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी कामाचे कौतुक केले.याची दाखल घेऊन वजनदार खाते देण्याऐवजी जलसंधारण रोजगार हमीचे खाते काढून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जुने बसस्थानक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या.
आंदोलनाचे नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष मुकुंद गर्जे, सोनोशीचे सरपंच गोकूळ दौंड, पंचायत समितीचे माजी सभापती संपत कीर्तने, शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष पप्पू बनसोड आदींनी केले. यामध्ये शहर तालुक्यातील मुंडे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानक आंदोलन झाल्याने प्रशासनाला याची कल्पना नव्हती. यावेळी मुकुंद गर्जे म्हणाले, राज्य शासनाची प्रतिमा जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून देशभर उंचावली. नामदार पंकजा मुंडे यांनी परिश्रमपूर्वक योजनेचे रूपांतर लोकचळवळीत केले. प्रत्येक गावाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. द्वेष भावनेतून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक खाते बदलले.
मुख्यमंत्री पक्ष संपवायला निघाले आहेत. कामाचे फळ म्हणून महसूल, कृषी असे खाते वाढीव रुपाने देण्याऐवजी आहे त्या खात्यात कपात करून जाणीवपूर्वक अपमानित केले जात असून यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगर पालिका आदी निवडणुका तोंडावर आहेत. ओबीसीनेत्यांना संपवण्याचे पक्षीय कारस्थान महागात पडेल. मुख्यमंत्र्यांनी खाते बदलाचा फेर विचार करावा. खात्यांची अडचण वाटत होती, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःकडील अनेक खात्यांपैकी एखादे खाते द्यायला हवे होते. सरपंच गोकुळ दौंड संपत कीर्तने म्हणाले, पदाचा धसका घेऊन मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडील खाते बदलले. जलयुक्त शिवार योजनेत मुख्यमंत्र्यांचा वाटा आहे.
बातम्या आणखी आहेत...