आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरमध्‍ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्‍या चिमुरड्याचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - दोन वर्षांचा चिमुरडा बिबट्याचा भक्ष्य बनला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तालुक्यातील जाखुरी येथे घडली. जयेश नाना रहाणे असे मृत बालकाचे नाव आहे. भारनियमन असल्याने परिसरात अंधार होता. जयेश शौचासाठी म्हणून अंगणात गेला होता. तेवढ्यात बिबट्याने झडप घालून त्याला जवळच्या शेतात उचलून नेले. हा प्रकार आईच्या लक्षात आल्याने ती ओरडली.

परिसरातील लोक लगेच शेताकडे धावले. सुमारे 400 लोकांच्या जमावाने मोटारसायकली व मोटारींच्या प्रकाशात जयेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या बिबट्याने नंतर जयेशला शेतात टाकून धूम ठोकली. जखमी अवस्थेत त्याला संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केला. मात्र, डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केले. जयेश हा रहाणे दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.