आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला करुया पाणीबचत: टंचाई असतानाही पाणी गळतीकडे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ऐन टंचाईच्या काळात महापाालिका प्रशासनाने शहरातील पाणी गळतीकडे दुर्लक्ष केले आहे. काही भागात कमी, तर काही भागात गरजेपेक्षा जास्त वेळ पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. नागरिकही नळांना तोट्या बसवण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी शहरात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासनाने पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक करत आहेत.

जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असताना शहर उपनगराला एक दिवसाआड पुरेसा पाणीपुरवठा सुरू आहे. केडगाव उपनगरात चार दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. शहरात मात्र काही नागरिक पाण्याच्या उधळपट्टीकडे डोळेझाक करत आहेत. मनपा प्रशासनाही पाण्याच्या पाण्याच्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. त्या तुलनेत शहरात मात्र पुरेसा पाणीपुरवठा सुरू आहे. मुळा धरणातील पाणीसाठी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाऊस पडून धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होण्यास मोठा अवकाश आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परंतु शहराच्या काही भागात उलट चित्र पहायला मिळते. सावेडी, मध्यवर्ती शहराचा काही भाग, बालिकाश्रम रस्ता परिसरात पाण्याची उधळपट्टी होत अाहे. काही भागात कमी, तर काही भागात गरजेपेक्षा अधिक पाणीपुरठा करण्यात येत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नळाला पाणी आल्यानंतर नागरिक पाणी भरून घेतात. परंतु त्यानंतरही नळाला पाणी सुरूच राहते. त्यात बहुतांशी नळांना तोट्या नसल्याने हे पाणी वाहून जाते. त्यामुळे मनपा प्रशासनाने नळांना तोट्या बसवण्यासाठी नागरिकांना भाग पाडावे, तरच ही पाण्याची उधळपट्टी थांबेल, अशी जागरूक नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे टंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपाने वारंवार करायला हवे, परंतु तसे झाल्यामुळे उधळपट्टी सुरुच आहे.

गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न हवेत
प्रशासनाने नळांना तोट्या बसवण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी. तसे झाल्यास पाण्याची गळती थांबण्यास मोठी मदत होईल. नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात, यासाठी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. केवळ शहर नाही, पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिन्यांमधून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. त्याकडेदेखील प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. महावीर पोखरणा, सामाजिक कार्यकर्ते.