आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: दगडफेकीत मोटारीचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वडापाव खाणाऱ्या मुलांमध्ये झालेल्या भांडणातून तेलीखुंट परिसरात रविवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास दगडफेक झाली. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंदोबस्त तैनात केल्यानंतर दोन तासांत बाजारपेठ पुन्हा पूर्ववत सुरु झाली. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तेलीखुंट परिसरातील एका हातगाडीवर काही मुले वडापाव खात होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. काही वेळातच गर्दी गोळा झाली. नंतर दगडफेक सुरू झाल्याने पळापळ झाली. जवळच पार्क केलेल्या स्विफ्ट कारची (एमएच १२ एलजे ६४७३) काच अज्ञात व्यक्तींनी फोडली. या घटनेमुळे बाजारपेठ ताबडतोब बंद झाली. माहिती समजताच पोलिस सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख, शहर विभागाचे उपअधीक्षक बजरंग बनसोडे, कोतवालीचे निरीक्षक सोमनाथ मालकर, तोफखान्याचे निरीक्षक अविनाश माेरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे काही वेळातच घटनास्थळी आला. दंगल नियंत्रक पथक वज्र वाहनही आले. पोलिसांनी चार संशयित युवकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी परिसरात फिरून जमाव पांगवला. नंतर कडेकोट बंदोबस्त तैनात केला.
आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, मनसेचे सतीश मैड अादींनी व्यापाऱ्यांना दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले.
तेलीखुंट परिसराची पाहणी करताना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी .