आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व शाळांत सोनू-मोनू बचत बँक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारात उपयोग करता यावा, म्हणून नगर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सोनू-मोनू बचत बँक सुरू करून बचतीचे महत्त्व विद्यार्थी पालकांना समजण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच केले.

अरणगाव जवळील खंडाळा येथील शाळेचे आयएसओ मानांकन वितरण सोहळा केंद्रप्रमुख ज्ञानदेव जाधव मुख्याध्यापिका दरंदले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात नवाल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर तालुका पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले होते. नवाल यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणारे मानांकन वेगवेगळे उपक्रम राबवणारे शिक्षक पाहून आनंद व्यक्त करून भविष्यात गावात येणाऱ्या खासगी बसेस बंद करण्याचे आव्हान प्राथमिक शिक्षकांपुढे असल्याचे सांगितले.
आयएसओ मानांकनाबरोबरच शाळांची श्रेणीही कशी होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक कडूस यांनी सांगितले. अरणगाव केंद्रात तालुकास्तरीय गणित विज्ञान संमेलनात घेतले. बालआनंद मेळावा यशस्वी केला. शाळांच्या श्रेणीमध्ये वाढ केली. केंद्रप्रमुख जाधव निवृत्त होत असल्याने शिक्षण विभागास त्यांची पोकळी नक्कीच जाणवेल, असेही कडूस यांनी सांगितले.

समाजाने सत्यशोधन केल्याशिवाय जि. प. शाळांवर नाहक टिप्पणी करू नये, असे सभापती संदेश कार्ले यांनी सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती जाधव, दरंदले यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अंबादास गारुडकर, शिक्षक नेते संजय धामणे, संजय शेळके, अरणगावचे सरपंच सुजित कोके, उपसरपंच मोहनतात्या गहिले, अकोळनेरचे सरपंच सुनील फाटक, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र शेळके, उद्योजक चंदू मेहेत्रे, संजय गारुडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय डावखरे यांनी केले. आभार विजय माने यांनी मानले.
बातम्या आणखी आहेत...