आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कोपर्डी\'च्या \'निर्भया\'ला कधी मिळणार न्याय?, बलात्काऱ्यांनी मृत्यूनंतरही केली तिची विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' मात्र अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. तिला कधी न्याय मिळणार? असा सवालही तरुणाईने उपस्थित केला आहे.

राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती.

दरम्यान, दिल्लीतील निर्भयाप्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोपर्डीतील या निर्घृण घटनेविषयी माहिती देत आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा कोपर्डी तालुक्यात घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम..
बातम्या आणखी आहेत...