आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता अर्धवट तरी टोल वसुलीची घाई, कोल्हार-कोपरगाव रस्त्यावर खड्डे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - टोलसुरू असूनही नगर-कोपरगाव महामार्गाची अवस्था अतिशय वाईट आहे. या महामार्गावरील बहुचर्चित कोल्हार-कोपरगाव टप्प्याचे काम नुकतेच करण्यात आले. ते अत्यंत निकृष्ट असतानाही या रस्त्यावर टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठेकेदाराला टोल सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

नगर-कोपरगाव रस्ता खासगीकरणातून करण्याचे ठरल्यापासूनच शुक्लकाष्ट लागले. सुरुवातीला या रस्त्याचे काम हरयाणा कन्स्ट्रक्शन कंपनीने मलेशियातील एका कंपनीबरोबर संयुक्तपणे मिळवले होते. परंतु तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रशासनाच्या आडमुठेपणाचा अनुभव आल्याने ‘हरयाणा’ने हे काम नंतर स्वीकारण्यासच नकार दिला. त्यावेळेस कंपनीने कोटी ३२ लाखांची अनामत रक्कम आणि भूमिपूजनासह इतर प्राथमिक बाबींसाठी केलेला किमान दोन कोटींच्या खर्चावर पाणी सोडले. कंपनीने हे काम मध्येच का सोडले, याचे गौडबंगाल अद्याप कोणालाच उलगडलेले नाही.

त्यानंतर नगर-कोल्हार रस्त्यासाठी कर्ज दिलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या चुकांचे परिमार्जन करून मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसून हे काम करण्यास तयार असलेल्या सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जुने कर्ज हस्तांतर करून त्यात नव्याने वाढीव कर्ज दिले. त्यामुळे निदान नगर-कोल्हार रस्ता कसाबसा पूर्ण झाला. हे काम अपूर्ण निकृष्ट दर्जाचे असल्याने कार्यकारी अभियंत्यांनी टोल बंद करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यावर काहीच कारवाई झाली नाही.

याच ठेकेदार सुप्रिम कंपनीस दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे काम देण्यात आलेे. या कामास कर्ज देणाऱ्या युको बँकेच्या ताठर भूमिकेमुळे कार्यारंभ आदेश घेतल्यानंतर सुरू केलेले काम ठेकेदारास बंद करावे लागले. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम ठेकेदाराकडून काढून घेतल्याचे पत्र त्यास दिले. ठेकेदाराने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात याचिकाही दाखल केली. त्याचा दावा दाखल झाल्यानंतर ठेकेदारास कर्ज देणारी प्रमुख युको बँक इतर बँकांनी ठेकेदारास कर्ज मंजूर करण्यास तत्त्वता मंजुरी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बँका ठेकेदार यांच्याकडून कालबद्ध काम करण्याची कुठलीही ठोस हमी घेता काम काढून घेतल्याचे पत्रच मागे घेतले ठेकेदारास पुन्हा काम बहाल करण्यात आले.
दुभाजकाजवळ खचलेला रस्ता.

वळण रस्ता अपूर्णच
११०कोटी खर्चाचे हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे डॉ. पिपाडा यांचे म्हणणे आहे. त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या रस्त्यावर फक्त डांबराचा एक थर टाकून रस्ता बनवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता खचला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत नसल्याने वाहने आदळत आहेत.

साईड पट्ट्या अपूर्ण; झाडेही नाहीत
साईडपट्ट्यांचीकामेही पूर्ण झालेली नाहीत. दुभाजकाची कामे चांगली झाली नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राहाता बाभळेश्वर येथील पुलाची कामे अर्धवट आहेत. ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला झाडेही लावलेली नाहीत. हा रस्ता चांगल्या दर्जाचा नसताना त्यावर टोल लावण्याची ठेकेदाराने घाई सुरू केली आहे. तज्ज्ञांच्या पथकाद्वारे या रस्त्याची आधी तपासणी करावी, तोपर्यंत टोल सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी पिपाडा यांनी केली आहे.

प्रस्ताव आलेला नाही
कोल्हार ते कोपरगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. टोल सुरु करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अजून आलेला नाही. नियमानुसार काम पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव येईल. रस्त्याचे काम किती झाले ते मला आता सांगता येणार नाही. एच. एम. विधाते, कार्यकारी अभियंता.