आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increase Number Of Water Tankers In Ahmednagar District

पाऊस सुरू झाल्यानंतरही जिल्ह्यात टँकर संख्येत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पावसाच्या आगमनानंतर पाणीटंचाई कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील टँकरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती वाढतच चालली आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल १३ टँकर वाढले आहेत. जिल्ह्यात बुधवारअखेर ३६४ टँकर सुरू होते. लाख ९१ हजार ४४७ नागरिकांना सध्या टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे.

जिल्ह्यातील अनेक विहिरी, कूपनलिका तलावातील पाण्याचा साठा उन्हाळ्यात कमी झाल्याने लाखो नागरिकांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. नगर िजल्ह्यात गेल्या गुरुवारपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. शनिवारी रविवारी जोरदार पाऊस झाला. पावसाला सुरुवात झाल्यामुळे टँकरची संख्या कमी होईल,अशी अपेक्षा होती. मात्र, टँकरची संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पारनेर, नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड श्रीगोंदे या तालुक्यांतून टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी पारनेरमध्ये आहेत. पाथर्डीतील तब्बल लाख १३ हजार २०५ नागरिकांना ८५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पारनेर तालुक्यात ६४ टँकर सुरू असून, लाख ३६ हजार नागरिकांना या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात मार्चपासून टँकरची संख्या सातत्याने वाढत गेली. मार्चमध्ये तब्बल १७७ टँकर सुरू होते. नंतर ही संख्या २०० वर गेली. गेल्या आठवड्यात ३५१ टँकर सुरू होते.आता ही संख्या ३६४ वर गेली आहे. बुधवारअखेर तब्बल ३६२ टँकरवर लाख ९१ हजार नागरिक अवलंबून होते. तब्बल २७७ गावे हजार १९३ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
तालुका निहाय टँकर : संगमनेर २२, अकोले ३, नेवासे १०, राहाता २, कोपरगाव ३, नगर ३७, पाथर्डी ८५, पारनेर ६४, शेवगाव ४०, कर्जत ४४, जामखेड ३७, श्रीगोंदे १२
सरकारी कमी, खासगी टँकर अधिक
जिल्ह्यात सध्या ३६४ टँकर सुरु आहेत. त्यात शासकीय टँकर अवघे २२ आहेत, तर खासगी टँकरची संख्या ३४२ आहे.