आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळीवाड्यात बौद्धवस्तीत अतिक्रमण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माळीवाडा परिसरातील बौद्धवस्तीमध्ये सिटी सर्व्हे नं. ६५६१ या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण भारत भिंगारदिवे, भूषण भिंगारदिवे व शोभा भिंगारदिवे यांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी तक्रार महार पंचमंडळ व परिसरातील नागरिकांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
बौद्धवस्तीमधील महार चावडीसमोर पूर्वेला १५० वर्षांपूर्वीचे लिंबाचे झाड तोडून व त्याच्या चहूबाजूने असलेला पार पाडून संबंधितांनी अतिक्रमण केले आहे. पाराचे दगड स्वत:च्या घराच्या बांधकामासाठी वापरण्यात अाले आहेत. या बेकायदा बांधकामाबाबत वारंवार तक्रारी करूनही मनपाने त्याची दखल घेतली नाही. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नुसार अशा प्रकारे विनापरवानगी बांधकाम केल्यास तीन वर्षे कारावास; अथवा पाच हजार रुपयांचा दंड; अथवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. मनपाने संबंधितांना नोटीस बजावली होती, त्याची मुदत संपली आहे, तरी कारवाई झालेली नाही. या अनधिकृत बांधकामामुळे पंचमंडळाच्या खोलीत असलेल्या भांड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम काढले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.