आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देणार : पालकमंत्री शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर आयोजित ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, २०१४-१५ या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीत बाधीत झालेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करणे, जे शेतकरी या कर्जाची वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील अशा शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज २०१५ -१६ या वर्षात माफ करणे, असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. कमी पावसामुळे उद्भवलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाच्या बाबीचे सुयोग्य िनयोजन करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. या अभियानांतर्गत निवडलेल्या २७९ गावांसाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुपाबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदी विभागांच्या समन्वयाने नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.