आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत 2020 पर्यंत ‘सुपर पॉवर’ होईल : गोडबोले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशातील तळागाळातील नागरिकांपर्यंत शिक्षण, आरोग्य, वीज व पाणी पोहोचवण्यात यश आले, तर सन 2020 पर्यंत भारत ‘सुपर पॉवर’ होऊन सर्वांना समान संधी मिळतील, असे ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले यांनी बुधवारी सांगितले.

स्नेहालयच्या इंग्लिश मीडियम इ-लर्निंग स्कूलच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर गोडबोले बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, रामभाऊ कारंडेकर, शिरीष मोहिले, संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गोडबोले म्हणाले, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम स्नेहालय करते. या माध्यमातून नागरिकांच्या सबलीकरणाचे काम ही संस्था सुरू आहे. काही वर्षांनंतर येथून उद्याचे डॉक्टर, इंजिनियर, गणितज्ज्ञ, संगणकतज्ज्ञ, चित्रकार, संशोधक, तसेच संगीतकार निर्माण होणार आहेत. दिलीप गोविंद म्हणाले, समाजाने दूर टाकलेल्या घटकांवर मायेचा हात फिरवण्याचे काम स्नेहालय करत आहे. माणूस शिक्षणातून घडतो. शिक्षणाशिवाय जीवनात पुढे जाता येत नाही. इंग्रजी माध्यम ही काळाची गरज आहे. ज्याला इंग्रजी भाषा कळाली, त्याला जगाचे ज्ञान अवगत करण्याचे माध्यम मिळाले. प्रास्ताविक राजेंद्र शुक्रे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संजय बंदिष्टी यांनी करून दिला. शाळेच्या पुढील वाटचालीची माहिती प्राचार्य सुनील शेवाळे यांनी दिली.