आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Administrative Officers Transfar News In Nagar, Rubal Gupta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिका-यांच्या बदल्या: दोन बैठका वगळता हार-तुर्‍यातच गेला आठवडा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या रविवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेणार्‍या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना आठवडाभरातच येथील सूत्रे सोडून जळगावला रवाना व्हावे लागले. गेल्या रविवारी सकाळी 11 वाजता त्यांनी सूत्रे घेतली व या रविवारी (16 फेब्रुवारी) सकाळी दहा त्यांना आपल्या पदाची सूत्रे सोडावी लागली. दोन बैठका वगळता अन्य दिवस हार-तुरे स्वीकारण्यात तसेच मुंबई व शिर्डीला जाण्यातच गेले.


नगरचे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची नाशिकला आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागेवर जिल्हा परिषदेच्या आधीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अग्रवाल यांची नियुक्ती झाली होती. गेल्या रविवारी (9 फेब्रुवारी) त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली होती. सोमवारचा दिवस हार-तुरे स्वीकारण्यात गेला. मंगळवारी त्या बैठकीसाठी मुंबईला गेल्या. बुधवारी कार्यालयात त्यांनी एक बैठक घेतली. गुरूवारी पुन्हा त्या मुंबईला गेल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शनिवारी त्या शिर्डीला गेल्या. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्या हाती बदलीचा आदेश पडला. रविवारी सकाळी दहा वाजता अग्रवाल निगरच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे सोडून जळगावच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेण्यासाठी तातडीने रवाना झाल्या.


दुष्काळात सर्वाधिक निधी मिळवला..
मागील वर्षी पडलेल्या दुष्काळात विविध उपाययोजनांसाठी नगर जिल्ह्याकरिता राज्यात सर्वाधिक एक हजार कोटींचा निधी मी मंजूर करून आणला. बाह्यवळण रस्ता खुला केला. राजस्व अभियान यशस्वीपणे राबवले. जिल्ह्यातील तलावांमध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम केले, अशी माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.संजीवकुमार यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

कवडे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद
प्रश्न - जिल्ह्यात गेली दोन वर्षे दुष्काळ व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.. उत्तर - मी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना पाण्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या. त्याच प्रकारच्या योजना नगर जिल्ह्यातही सुरू करण्याचा माझा मानस आहे.
प्रश्न - कुठल्या विषयांना प्राधान्य देणार? उत्तर - प्रथम जिल्ह्यातील समस्या जाणून घेऊन त्यातील मूलभूत गरजा कुठल्या याचा आढावा घेऊन त्या विषयांना प्राधान्य दिले जाईल. पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पाझर तलाव, गाळ काढणे या कामांना प्राधान्य देण्यात येईल.


अनिल कवडे यांनी स्वीकारला पदभार
अग्रवाल यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून अनिल कवडे यांची नियुक्ती झाली असून रविवारी रात्री सव्वाआठ वाजता त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सुटीचा दिवस असूनही त्यांनी कार्यभार हाती घेतला.