आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी पद्धत हद्दपार व्हावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आज सर्वच क्षेत्रात करार पद्धतीने भरती करण्याची पद्धत रुढ झाली आहे. करार पद्धतीने कामगारांची भरती करण्याच्या प्रकारामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांवर मोठी कु-हाड कोसळली आहे.
कंत्राटी पद्धत मुळापासून उखडून फेकावी व कायमस्वरूपी कामगार भरतीचे धोरण अवलंबावे. कामगारधार्जिण्या कायद्यांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा "दिव्य मराठी'ने शनिवारी आयोजित केलेल्या "औद्योगिक कामगार' या विषयावरील टॉक शोमध्ये व्यक्त करण्यात आली. या टॉक शोमध्ये सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी विजय शिंदे, कैलास मुजुमले, उद्योजक व कामगारांचे कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. धनंजय सप्तर्षी, आयटकचे प्रतिनिधी व विधी सल्लागार अ‍ॅड. सुधीर टोकेकर, शिवसेनेच्या कामगार सेनेचे सचिव संदीप महाले, उद्योजक श्रीकांत वैद्य, महेंद्र (भैया) गंधे, एमआयडीसी कामगार कृती समितीचे प्रतिनिधी शिवाजी साळवे, मनसे कामगार सेनेचे चंद्रकांत ढवळे, कामगार सेनेचे माजी प्रतिनिधी अशोक दहिफळे, कामगार सेनेचे सचिव रावसाहेब भाकरे, कामगार प्रतिनिधी किरण शिंदे यांनी सहभाग घेतला.
सध्या उद्योगांमध्ये जवळपास ९० टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. त्यामुळे त्यांना प्रचलित कायद्याचे संरक्षण मिळत नाही. कमी वेतन, असुरक्षितता, दुय्यम वागणूक आदी बाबींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कंत्राटी पद्धतीला कडाडून विरोध करण्यात आला. कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल करून कामगारधार्जिणे कायदे करण्याची निकड व्यक्त करण्यात आली.
टॉक शोमधील मुद्दे-
कामगार धोरणात आमूलाग्र बदल हवा.
कंत्राटी पद्धत कायमची रद्द करावी.
मोठ्या व छोट्या उद्योगांसाठी वेगळे
कायदे करण्याची गरज.
किमान वेतन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
कामगार अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक.
श्रमिक हॉस्पिटल व कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात.
विद्यमान कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही, ती व्हावी.
कामगारांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
आकसापोटीच्या कारवाया टाळाव्यात.
उद्योग चालले तरच कामगार जगतील.
उद्योग अडचणीत आणणारे कामगार व संघटनाचे वर्तन नको.
भविष्यनिर्वाह निधी सक्तीने जमा करणे कामगारांच्या हितासाठी गरजेचे.