आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र ठरवूनही घैसास, अनभुलेंनी पद सोडले नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रा.मुकुंद घैसास डॉ. रावसाहेब अनभुले यांना संचालक पदासाठी अपात्र ठरवूनही विविध मार्गांनी त्यांनी पद सोडले नाही. गेल्या ३-४० वर्षांतील गैरकारभार सभासदांसमोर येईल, या भीतीने घैसास यांनी बँकेत वारस देऊन गैरकारभार झाकण्याची व्यवस्था केल्याचा आरोप अंकुश पॅनेलचे प्रमुख बँकेचे माजी अध्यक्ष मोहन कामथ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. शहर बँकेच्या निवडणुकीत नवीन कोणता मुद्दा नसल्याने त्यांनी जुन्याच आरोपांना फोडणी दिली.
कामथ म्हणाले, १९८३ ते ८५ दरम्यान धनादेश हुंड्या वठवून बिगर सभासदांना कर्ज दिल्याप्रकरणी प्रा. घैसास डॉ. अनभुले यांच्यासह इतर संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. वसुलीची रक्कम भरण्यात टाळाटाळ करून संबंधितांनी पद राखले. प्रकरण खंडपीठातही गेले. मात्र, न्यायालयाच्या िनकालाचा सोयीचा अर्थ लावून ते पदाला चिकटून बसले. कोटेशन मागवता खरेदी, दलालांमार्फत कामे, बिगर सभासदांना कर्ज, नोकरभरती आदींच्या माध्यमातून गैरकारभार झाल्याचा आरोप कामथ यांनी केला.

प्रचारावर भर : घैसास
प्रतिक्रियेसाठी प्रा. घैसास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणत्याही आरोपाला सध्या उत्तर देणार नसल्याचे सांगितले. सभासदांना सर्व बाबी माहिती असून त्यांच्या माध्यमातूनच संबंधितांना उत्तर मिळेल, असे ते म्हणाले.