आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव चार महिन्यांत १८ मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वाइनफ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तथापि, मागील चार महिन्यांत १८ रुग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हार येथे मागील आठवड्यात झालेला एकाचा मृत्यूदेखील स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचे समोर आले आहे. जिल्हाभरात स्वाइन फ्लूची धास्ती वाढल्याने आरोग्य विभागासमोर नियंत्रणाचे आव्हान उभे आहे. 
 
स्वाइन फ्लू रोग सामान्यतः डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. हा संसर्गजन्य रोग असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो प्रसारित होतो. देशात २००९ मध्ये स्वाइन फ्लूची साथ पसरली होती. या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील घशातील स्राव, त्याचा घाम किंवा थुंकी यामधून होतो. ताप खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. २०१४ पासून या आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले. आता हा आजार सर्वत्र आढळून येत आहे. नगर जिल्हा स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावात राज्यात चौथ्या क्रमांकावर अाहे. 

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, तसेच जिल्हा आरोग्ययंत्रणेमार्फत स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तथापि, अजूनही हा आजार नियंत्रणात आलेला नाही. महिनाभरापूर्वी संगमनेर येथील रुग्णाचे निदान झाले होते. त्यापाठोपाठ कोल्हार येथे आठवडाभरापूर्वी एका संशयिताचा मृत्यू झाला. नमुना तपासणीनंतर आलेल्या अहवालानुसार हा मृत्यूदेखील स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात जानेवारीपासून ४३ हजार ८८७ तापाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी १९३ संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. बहुतेक रुग्ण बरे होऊन घरी गेले असले, तरी स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनाही समोर आल्या आहेत. 
 
तालुकानिहाय झालेले मृत्यू 
नगर १, कर्जत १, कोपरगाव ३, नेवासे ३, राहाता २, संगमनेर श्रीरामपूर तालुक्यातील चारजणांचा मृत्यू झाला. अकोले, जामखेड, पाथर्डी, राहुरी या तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. 

उपचारानंतर रुग्ण बरा होतो 
^तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेतली आहे. प्रचार प्रसिद्धी केली आहे. आैषधे मुबलक असून नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण बरे होऊ शकतात.'' डॉ.पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

जिल्ह्यात ४६ रुग्णांना स्वाइन फ्लू 
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक प्रत्येकी रुग्ण राहाता संगमनेर तालुक्यात आढळून आले. त्याखालोखाल श्रीरामपूर ७, कोपरगाव ६, नगर ५, श्रीगोंदे नेवासे येथे प्रत्येकी ४, कर्जत शेवगाव, पारनेर येथे प्रत्येकी असे ४६ रुग्ण आढळले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...