आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी अहमदगर कोर्टात आज (शनिवार) अंतिम निकाल देणार आहे. कोर्टाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरूवात होईल. त्यानंतर काही वेळातच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोर्ट व्यवस्थापनाने ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे. तसेच कोर्ट परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना कोर्टात आणण्यात आले असून सुनावणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते.
या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
सुनावणीसाठी न्यालयाच्या आवारात 600 पोलिसांचा चोख बंदोबस्त व राखीव दलाच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आवारात बॉम्बशोधक व श्वानपथकही तैनात करण्यात आले आहेत. न्यायालय प्रवेशद्वारात मेटल डिटेक्टर लावण्यात आले असून केवळ वकील व पत्रकारांनाच न्यायालयात देण्यात येत आहे.
निकाल काहीही लागो, जनतेने शांतता बाळगावी- उज्ज्वल निकम
या प्रकरणी पिडीतेची बाजु मांडणारे विशेष सरकारी वकील उज्जव निकम यांनी निकाल काहीही लागो, जनतेने शांतता बाळगावी असे आवाहन केले आहे. या प्रकरणासंबंधी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना ते म्हणाले, 'या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नाही. त्यामुळे न्यायालयात परिस्थितीजन्य पुरावे सादर केले आहेत. संपूर्ण खटल्यामध्ये 31 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरात निषेधाचे मोर्चे निघाले, ही निश्चितच चांगली बाब आहे. मात्र कोर्टाचा निकाल जनभावनेने लागत नाही. त्यामुळे निकाल काहीही लागो, जनतेने शांतता बाळगायला हवी.'
पुढे क्लिक करून वाचा: काय घडले होते त्या दिवशी, मद्यधुंद नराधमांनी तोडले होते निर्भयाचे लचके
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.