आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या बदल्या : ‘आंतर जिल्हा’ ऑनलाइन प्रणालीचा उडाला बोजवारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरकारने बदल्यांचे धोरण आखताना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, आंतरजिल्हा बदलीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सरल ऑनलाइन स्टाफ पोर्टलचा बोजवारा उडाला आहे. संकेतस्थळ उघडले जात नसल्याने अर्ज भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. 
 
ग्रामविकास विभागाने या वर्षापासून आंतरजिल्हा बदल्या जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरून करण्याचा निर्णय घेतला. परंतु सरकारने कोणतीही पूर्वतयारी करता घाईतच निर्णय घेतल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी सरल प्रणालीत आॅनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षकांना मेपर्यंत अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, स्टाफ पोर्टल ट्रान्स्फर पोर्टल वारंवार बंद रहात असल्याने शिक्षक धास्तावले. शिक्षकांनी सेवेच्या संदर्भात सर्व माहिती स्टाफ पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. सरल प्रणालीत माहिती भरल्यानंतर ट्रान्स्फर पोर्टलमध्ये जाऊन बदलीसाठी पात्र असलेल्या
शिक्षकांनी अर्ज भरण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. 
 
अनेक वर्षांपासून इतर जिल्ह्यांत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने इच्छेनुसार जिल्हा निवडता येणार आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेंतर्गत सेवेत येण्यासाठी दोन हजारांवर लेखी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून या बदल्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षकवर्गात तीव्र नाराजी आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर सरकारने राज्यस्तरावरूनच आॅनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन पद्धतीच्या बदल्यांच्या निर्णयामुळे ज्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव दिले, त्यांना पुन्हा एकदा बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागत आहेत. आधीच वर्षानुवर्षे घरापासून दूरवरच्या जिल्ह्यात नोकरी करणारे शिक्षक प्रचंड तणावाखाली आहेत. आंतरजिल्हा बदली अर्जासाठी शिक्षक कायम केल्याची (स्थायित्व लाभ) जिल्हा परिषदेची मंजुरी आवश्यक केली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात दमछाक झालेल्या शिक्षकांना आता ऑनलाइन सरल प्रणालीने छळले आहे. बदलीचा अर्ज करण्यासाठी सरकारने मुदत दिली होती, पण संकेतस्थळच उघडले जात नसल्याने मुदतीत अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे वारंवार मुदतवाढ देऊनही तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरता आले नाहीत. बदलीसाठी इच्छुक शिक्षकांची होलपट अजूनही थांबलेली नाही. 
 
सरकार हट्ट सोडणार का? 
आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन सरल प्रणाली उपलब्ध केली. परंतु तांत्रिक अडचणींमुळे हे संकेतस्थळच उघडत नाही. आणखी काही दिवस संकेतस्थळाचा प्रश्न सुटला नाही, तर ऑनलाइनचा हट्ट सोडणार का, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. 
 
जिल्हा परिषदेकडे उत्तर नाही 
बदल्यांची प्रक्रिया आता जिल्हा परिषद स्तरावर ठेवता ऑनलाइन पद्धतीने सरकारनेच हातात घेतली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींवर जिल्हा परिषदेकडे उत्तर नाही. संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रणाली सुरू करण्याची जबाबदारी अाता सरकारवरच आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...