आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संच मान्यतेची माहिती देण्यास टाळाटाळ, अधिकाऱ्यांनीच लपवली माध्यमांपासून माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मोठा असून या विभागांतर्गत दहा हजारांवर शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. सर्व शिक्षकांचे लक्ष लागून असलेली २०१४-२०१५ वर्षातील संच निश्चितीला शिक्षण खात्याने मान्यता दिली. तथापि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली. माहिती दडवण्यामागे काय गौडबंगाल आहे, याची उत्सुकता कर्मचाऱ्यांमध्येही शिगेला पोहोचली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात साडेतीन हजारांवर शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. सप्टेंबरअखेरच्या पटाचा विचार करून संच निश्चिती ठरवली जाते. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्याही निश्चित होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०१३-२०१४, २०१४-२०१५ या वर्षातील माहिती ऑनलाइन पद्धतीने संच मान्यतेसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवली होती. त्यात त्रुटी राहिल्याने पुन्हा उर्दू मराठी अशी वर्गवारी करून अंतिम मान्यतेसाठी गोषवारा पाठवण्यात आला.
दोन वर्षांची संचमान्यता प्रलंबित असल्याने २०१३ वर्षातील संच मान्यतेच्या आधारावर जिल्ह्यात शिक्षण विभाग कार्यवाही करीत आहे. त्यामुळे शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांवरही अन्याय होत आहे. दोन्ही वर्षांची संचमान्यता एकाच वेळी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यासाठी ऑनलाइन माहिती मागवून संच मान्यता करण्यात आली. पण त्याला अंतिम मान्यता शिक्षण उपसंचालकांनी देणे अपेक्षित होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच २०१४-२०१५ या वर्षाची संच मान्यता मिळाली.

यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी माहिती देण्यास नकार देऊन जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे बोट दाखवले. त्यानंतर कडूस यांना संच मान्यतेची माहिती विचारली असता त्यांनीही नकार देत.

कार्यालयात कुणालाही बरोबर माहिती देता येणार नाही, असा शोध लावला. ही माहिती दडवण्यामागे काय गौडबंगाल आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण प्रक्रियाच धिम्या गतीने सुरू असल्याने पदोन्नत्या, आंतरजिल्हा बदली आदी प्रश्न प्रलंबित पडले आहेत. संच मान्यतेची माहिती दडवून शिक्षण विभागाला काय साध्य करायचेय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कडूस यांची टोलवाटोलवी
२०१४-२०१५वर्षातील संचमान्यतेची माहिती देण्यास दोन्ही उपशिक्षणाधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर जिल्हाशिक्षणाधिकारी कडूस यांच्याशी संपर्क साधला. त्यावर कडूस म्हणाले, गोषवारा अजूनही खाली दिला नाही. त्यांना कोणालाही काहीच सांगता येणार नाही. ते चुकीचे जाईल. मी पूर्ण पाहिल्याशिवाय देता येणार नाही. चुकीचे छापण्यात काय अर्थ आहे. मी अजूनही पाहिले नाही, अशी टोलवाटोलवी त्यांनी यावेळी केली.