आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inquiry Report Submitted To The Divisional Commissioner

"मूलभूत'चा चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मूलभूत सुविधांचा ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावाची मंजुरी पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी होणारी बैठक रद्द झाली.
दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार मूलभूतच्या प्रस्तावातील १४८ कामांच्या चौकशीचा अहवाल महापालिका प्रशासनाने सादर केला. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलेले आरोप अहवालात फेटाळण्यात आले आहेत. प्रस्तावात अनेक बोगस कामांचा समावेश केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

तीन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मूलभूत सुविधांच्या ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावात मनपाने अनेक बोगस कामे दाखवली आहेत. त्यामुळे या प्रस्तावास मंजुरी देऊ नये, अशी तक्रार बोराटे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. विभागीय आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत कामांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने या कामांचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी सादर केला. या अहवालात बोराटे यांनी केलेला बोगस कामांचा आरोप फेटाळण्यात आला आहे.
चौकशी अहवालात १४८ कामांपैकी कामे वगळण्यात आली आहेत. प्रस्तावातील कामांचा चौकशी अहवाल देताच दोन-तीन कामे बदलून पुन्हा पूर्वीच्याच कामांची यादी मनपा प्रशासनाने मंजुरीसाठी दिली आहे, अशी तक्रार बोराटे यांनी मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मागील आठवड्यात होणारी बैठक विभागीय आयुक्तांनी रद्द करून ती गुरुवारी ठेवली होती. परंतु ही बैठकही अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे ४० कोटींच्या मूलभूत सुविधांच्या प्रस्तावाची मंजुरी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

शासनाने शहरातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी महापालिकेला तीन वर्षांपूर्वी २० कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी देताना महापालिकेनेही तेवढाच निधी टाकून ४० कोटींच्या कामाचा प्रस्ताव सादर करण्याची अट शासनाने घातली होती. त्यानुसार मनपाने नगराेत्थान अभियानांतर्गत प्राप्त झालेले दहा कोटी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून दहा कोटी असा २० कोटी रुपयांचा स्व:हिस्सा टाकून ४० कोटींच्या कामाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला. मात्र, या प्रस्तावाची मंजुरी दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे.

बोगस कामांचे पुरावे
मूलभूत सुविधांच्या प्रस्तावात अनेक बोगस कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. जी कामे झालेली आहेत, अशा कामांचा प्रस्तावात समावेश आहे. चौकशी अहवालात प्रशासनाने तीन कामे वगळली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी चार कामे बोगस असून त्याचे पुरावे आपल्याकडे अाहेत. हे पुरावे योग्य वेळी सादर करणार आहे.'' बाळासाहेबबोराटे, नगरसेवक.