आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आंतरजिल्हा’ची मावळली आशा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली करण्याच्या मुद्द्यावरून संघटना व पदाधिकारी असा वाद उभा राहिला आहे. तथापि सप्टेंबरअखेर होणाऱ्या पटपडताळणीत अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सावध भूिमका घेत आहे. तसेच यासंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. त्यामुळे सध्यातरी आंतरजिल्हा बदलीने रिक्त जागा भरण्याची आशा मावळली आहे.

मुळचे नगर जिल्ह्यातील अनेक शिक्षक इतर जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत आहेत. इतर जिल्ह्यांमधून नगरमध्ये येण्यास सुमारे दीड हजार शिक्षक इच्छूक आहेत. त्याबरोबरच २०१० मधील भरती प्रक्रियेतील सुमारे १३७ उमेदवारही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेर पटपडताळणी करून पटनिहाय शिक्षकांची शाळांवर निश्चिती केली जाते. मात्र दिवसंेदिवस पटसंख्या घसरत असल्याने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना तसेच इतर जिल्ह्यातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात संधी मिळण्यास अडचणी येतात. दरवर्षी निवृत्तीसह इतर कारणांनी सुमारे दोनशे ते अडीचशे जागा रिक्त होतात, पण या जागा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातून भरल्या जातात. सध्या जिल्हा परिषदेत सुमारे साडेतीनशे जागा रिक्त अाहेत. या रिक्त जागांवर शिक्षकांचा डोळा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तसेच सप्टेंबरची पटपडताळणी होण्यापूर्वीच आंतरजिल्हा बदली करावी, असा आग्रह शिक्षकांसह काही लोकप्रतिनिधींनी धरला आहे. पण संभाजी ब्रिगेड, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनांनी पदाधिकारी व शासनाच्या आंतरजिल्हा बदलीच्या भूिमकेला कडाडून विरोध केला आहे. तसेच नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले उमेदवारही संघटनांच्या बरोबरीने विरोधात उतरले आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती आंतरजिल्हा बदलीला पोषक नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले. तथापि शिक्षण विभागात शिक्षकांची मोठी गर्दी असून बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वाखाली पात्र भावी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, पृथ्वीराज वाघाडे, रुपाली पळसकर, बाळासाहेब सावंत, अवधूत पवार, विजय खेडकर आदी उपस्थित होते. संघटनांकडून होत असलेला विरोध तसेच पटपडताळीनंतर होणारे संभाव्य अतिरिक्त शिक्षक, एक ते दहा पट असलेल्या शाळांमधील अतिरिक्त होणारे शिक्षक आदी शक्यता प्रशासकीय पातळीवर पडताळून पाहिल्या जात आहे. यासंदर्भात निर्णय मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल घेणार अाहे. परंतु, सद्यस्थितीत आंतरजिल्हा बदलीच्या आशा मावळत चालल्याचीच चिन्हे दिसून येत आहेत.

सर्व शक्यता तपासू
सध्या आंतरजिल्हा बदली आिण सीईटीतील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार हे दोन विषय चर्चेत आहेत. पण रिक्त जागांवर अनुकंपा, प्रकल्पग्रस्त यासह इतरांकडूनही नियुुक्तीसाठी आग्रह होत आहे. परंतु, सप्टेंबरमधील पटपडताळणीचा अंदाजीत आढावा घेतला जाइल. सर्व शक्यता पडताळून पाहिल्यानंतरच रिक्त जागा भरण्याचा निर्णय होइल, यासाठी घाई केली जाणार नाही.” ए. एन. कडूस, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक)