आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दिल्लीतील यशानंतर ‘आप’ने लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संघटन उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली, पण खरा कार्यकर्ता कोण यावरून अंतर्गत गटतटाचे राजकारण सुरू झाले आहे.

दिल्लीतील विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लहू कानडे, किरण वैरागर, नितीन उदमले यांची नावे चर्चेत आहेत. उत्तरेत आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपट पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे पक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, जामखेड येथील अप्पासाहेब गोपाळघरे यांनी रितसर ऑनलाइन अर्ज भरला असल्याची माहिती दिली. पण या पक्षातील सभासदांनी गोपाळघरे पक्षाचे सभासद नसल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षांतर्गत विसंवाद व कोण खरा पदाधिकारी हा वाद चव्हाट्यावर आला.

मेळाव्यात साने यांनी पदाधिकार्‍यांची नावेही या निमित्त जाहीर केली, त्यावेळी काही जणांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. पक्षाची धोरणे आम्हाला पटली म्हणून आम्ही पक्षात आलो. साने यांनी सुनावल्याने काही सभासद नाराज झाल्याचे कार्यकर्त्यांनी ‘दिव्य मराठी’शी खासगीत बोलताना सांगितले.

पक्षात गट-तट नाहीत; ते त्यांचे वैयक्तिक मत
आमच्या पक्षात कोणतेही गट-तट नाहीत, पण साने यांची पत्रकार परिषद पक्षाने आयोजित केलीच नाही. पक्षात कोणीही नेता नाही सारेच एकजिवाने काम करतात. पक्षापासून कोणीही दुरावले नाही. अंतर्गत नाराजीबाबत मतप्रदर्शन केले असेल, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असेल.’’ किरण उपकारे, जिल्हा समन्वयक, आप.