आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणीमध्ये उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिषद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोणी येथील प्रवरा ग्रामीण शकि्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २० ते २२ ऑगस्ट या कालावधीत ‘विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनकि प्रवाह व आव्हाने’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेचे उद्घाटन बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी १० वाजता अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते व प्रवरा ग्रामीण शकि्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विखे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पायरेन्स कॅम्पसमधील सेमनिार हॉलमध्ये होईल. या कार्यक्रमास कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्रवरा ग्रामीण शकि्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक पाटील, उपाध्यक्ष एम. एम. पुलाटे, कार्यकारी विश्वस्त राजेंद्र विखे, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण व प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी आदी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेचा समारोप शुक्रवारी (२२ ऑगस्ट) दुपारी तीन वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाढे यांच्या उपस्थितीत व डॉ. एम. जी. ताकवले यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

हे तज्ज्ञ करतील परिषदेत मार्गदर्शन
‘विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनकि प्रवाह व आव्हाने’ या विषयावर बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. बबन इंगोले (गोवा), डॉ. कार्लोस मचाडो (जर्मनी), डॉ. स्टिफन (जपान), डॉ. लिंगा किरगे (रशिया), डॉ. रामकृष्णन (अमेरिका), डॉ. कोईनकर (जपान), डॉ. सॅबेस्टीन (स्पेन), चैतन्य भंडारे (जपान) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

४५० पेक्षा जास्त शोधनिबंध
या परिषदेसाठी जपान, स्पेन, अमेरिका, थायलंड या देशातील संशोधकांसह देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांतील ४५० पेक्षा जास्त प्राध्यापकांचे शोधनिबंध आले आहेत. परिषदेत पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्रााणिशास्त्र, भूशास्त्र, शेतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, संगणकशास्त्र व तंत्रज्ञान यावर चर्चा होईल.