आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवास जल्लोषात प्रारंभ, देश-विदेशातील गायक-गायिकांची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- येथील क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर खिस्ती मंडळी मन्ना ग्रूप ऑफ मिनास्त्रीज यांच्यातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला. नगर शहरातील १४८ युवक-युवतींनी सादर केलेल्या गीताने या महोत्सवाला सुरुवात झाली.

प्रास्ताविक रेव्ह. के. सी. जोयसन यांनी केले. येशुवा बंड यांनी संगीत वाद्ये सादर केली, वर्सीस जॉन दिल्ली, क्रिकेट विश्वचषकाचे गायक दयानिधी राव यांनी गीते सादर केली. मास्टर येशपाल (हैदराबाद)व ब्र विन्सेस (ओडिशा) या संगीतकारांनी संगीत संयोजन केले. विविध राज्यांतील गायकांनी गीते सादर केल्यावर पुणे येथील युवतींनी विदूषक डान्स सादर केला. नॉर्वेतील रुनी एडव्हर्डसन अनेक विदेशी गायकांनी रॉक्स गीते सादर केली. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात गाणे, संगीतांना दाद दिली. पाहुण्यांचा सुरेश भिंगारदिवे, जॉय लोखंडे यांनी सत्कार केला. कार्यक्रमास ख्रिस्ती समाज संगीतप्रेमी उपस्थित होते.

क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर आयोजलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ झाला. यावेळी नगर मधील १४८ युवक-युवतींनी गीत सादर केले.