आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of 169 Nationalist Congress Party Interested Candidate

राष्ट्रवादीने घेतल्या 169 जणांच्या मुलाखती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 169 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी प्रभाग 23 व 29 साठी मुलाखत दिली.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. राष्ट्रवादीने शनिवारी (16 नोव्हेंबर) प्रभाग क्रमांक 1 ते 16 व रविवारी 16 ते 34 मधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी 169 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी भवनात प्रवेश केला. पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, अरुण जगताप, प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, शंकरराव घुले, राजश्री मांढरे, अँड. शारदा लगड, राजीव राजळे आदी उपस्थित होते.

शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी प्रभाग 23 व 29 साठी मुलाखत दिली. शीतल जगताप यांनीही प्रभाग 29साठी मुलाखत दिली.

राष्ट्रवादीने स्वबळावरच लढावे, यासाठी अनेकजण आग्रही असून शहरात राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्याचे काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ 19 नोव्हेंबरला फुटणार आहे. यावेळी पालकमंत्री मधुकर पिचड, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, काकडे, कळमकर, घुले, आमदार जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.