आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलंक पुसण्याची संधी आयुक्तांनी दिली...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अंगणवाडीतील बालकांना वाटल्या जाणा-या राजगिरा चिक्कीत रेती आढळून आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुरवठादारावर कारवाईची भूमिका घेण्याऐवजी खराब चिक्की पुरवठादाराला परत करून त्याबदल्यात चांगल्या चिक्कीचा पुरवठा करावा, असा आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी जिल्हा परिषदेला दिला. बालकांच्या आरोग्याशी हा खेळ असताना पुरवठादाराला कलंक पुसण्याची संधी आयुक्तांनी दिल्याने जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे.

अंगणवाड्यांमधील बालकांना चिक्की वाटण्याचे धोरण सरकारने घेतले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत चिक्की पुरवण्यात आली. ही चिक्की एका बालकाला १०० ग्रॅमप्रमाणे पाच ते सहा पाकिटे वाटण्यात आली. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत वरिष्ठ स्तरावरून आलेला पुरवठा प्रकल्पस्तरावरून वाटण्यात आला. राजगिरा चिक्कीत मोठ्या प्रमाणात रेती मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची बाब नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी सर्वप्रथम जूनला उघडकीस आणली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी प्रकल्प स्तरावरील पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले, तसेच चिक्कीचा नमुना एकात्मिक बालविकास आयुक्त विनिता वेधसिंघल यांच्याकडे पाठवला. त्यावर आयुक्तांनी हा अजब सल्ला जिल्हा परिषदेला दिला.

भेसळयुक्त चिक्की बालकांना देणे हा गुन्हा असून याप्रकरणी तत्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. आयुक्तांनी दिलेला अजब सल्ला पाहून त्यांनी पुरवठादाराला कलंक पुसण्याची संधी दिल्याचेच दिसते. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पांमध्ये राजगिरा चिक्कीचा पुरवठा करण्यात आला आहे. ज्या प्रकल्पाला पुरवठा झालेली चिक्की खराब असेल, अशी चिक्की प्रकल्पस्तरावरून जप्त करून संबंधित पुरवठादाराला परत करावी त्या बदल्यात लाभार्थींना चांगल्या चिक्कीचे वाटप करावे, असा सल्ला आयुक्तांनी दिला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार चिक्की परत करण्याची तयारी सुरू केली. पण जिल्हा परिषदेच्या गुुरुवारी (१८ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी आयुक्तांच्या सल्ल्यावर आगपाखड केली. आयुक्त पुरवठादाराला पाठीशी घालत आहेत, असा आरोप सदस्य बाळासाहेब हराळ संदेश कार्ले यांनी केला. खराब माल आयुक्तांच्या सांगण्यावरून पुरवठादाराला परत करता तो जप्त करावा. त्याचे नमुने तीन-चार विविध प्रयोगशाळांत तपासणीसाठी पाठवावेत, असा ठरावही सभेत करण्यात आला.
चिक्की भेसळप्रकरणी आमदार संग्राम जगताप, तसेच आमदार वैभव पिचड यांनी गुरुवारी दुपारी अध्यक्ष मंजूषा गुंड यांची भेट घेऊन माहीती घेतली. जिल्हाभरात या प्रकाराचा निषेध होत असून काही लोकप्रतिनिधी आंदोलन छेडण्याच्याही तयारीत आहेत.

जिल्ह्यातच तयार झाली चिक्की
संबंधितपुरवठादाराने जिल्ह्यातील चिक्की निर्मिती केंद्राबाबत प्रशासनाला कळवणे अपेक्षित होते. तथापि, तशी कोणतीही माहिती प्रशासनाला कळवली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य, तसेच पंचायत समिती पदाधिकाचे म्हणणे आहे. बेकायदेशीरपणे जिल्ह्यातच केडगाव भाळवणी परिसरात चिक्की तयार केली गेल्याचा संशय लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

आयुक्तांवर कारवाई करा
चिक्कीवाटण्याचा शासनाचा हेतू शुद्ध होता. पण या हेतूला प्रशासकीय यंत्रणेने हरताळ फासला. लहान मुलांनी ही चिक्की खाल्ली. हा प्रकार गंभीर असताना आयुक्तांनी पुरवठादाराचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पुरवठादाराला पाठीशी घातल्यासारखा आहे. त्यामुळे तातडीने आयुक्तांवर कारवाई करावी. तसेच जबाबदार व्यवस्थेवरही कारवाई व्हावी.'' संदेशकार्ले, सभापती, पंचायत समिती, नगर.

-७.७७ - लाख क्की पाकिटे
- २१प्रकल्प कार्यालये
- १.६५- लाख लाभार्थी
- ५३८७- अंगणवाड्या
बातम्या आणखी आहेत...