आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदुर्खीत वानराचा केला दशक्रियाविधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- राहातातालुक्यातील नांदुर्खी खुर्द येथे चक्क वानराचा दशक्रिया विधी आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आला. पिंडदान करताना अनेकांनी मुंडण करून वानराच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. विशेष म्हणजे या विधीस दोन वानरांनी उपस्थित राहून आपल्या सहकार्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

नांदुर्खी येथील नाना लक्ष्मण डांगे यांच्या शेताजवळ दहा दिवसांपूर्वी एक वानराचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या नातेवाईकास कळवून अंत्यसंस्कार केले. फक्त अंत्यसंस्कारच केले नाही, तर दहावा कार्यक्रमाचे आयोजन करून नातेवाईक, भाऊबंदास आमंत्रित केले. नांदुर्खीत दशक्रिया विधी पारंपरिक पद्धतीने पार पडला. मैड महाराज यांचे प्रवचन यावेळी झाले. अनेकांनी मुंडणही केले. पिंडदान केल्यानंतर उपस्थितांना जेवण देण्यात आले. हनुमानभक्त नानासाहेब डांगे यांनी आपल्या शेतात म्हसोबा मंदिरालगत या वानराची समाधी तयार करून त्यास नवशा मारुती नाव दिले.

दशक्रिया विधीसाठी राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, संभाजी औताडे, जालिंदर वाणी, सुनील वाणी, गोपीनाथ वाणी, भाऊसाहेब वाणी, नवनाथ वाणी, दत्तात्रेय वाणी, बापुराव वाणी, अण्णासाहेब दाभाडे, ज्ञानेश्वर दाभाडे, रतन पवार यांनी पुढाकार घेतला. यावेळी नांदुर्खी खुर्द, नांदुर्खी बुद्रूक, कनकुरी, डोऱ्हाळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहाता तालुक्यातील नांदुर्खी खुर्द येथे वानराचा दशक्रिया विधी पारंपरिक पद्धतीने करून प्राणिमात्राविषयी आपली आस्था व्यक्त करण्यात आली.