आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या स्थापनादिनाला साज अवैध फलकांचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजपचा स्थापना दिन खासदार दिलीप गांधी यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या अवैध फ्लेक्सफलकांनी शहराच्या विविध चौकांतील जागा व्यापल्या आहेत. अवैध फलकांबाबत न्यायालयाने कडक भूमिका घेतलेली असतानाही भाजपने सर्रास हे फलक लावले आहेत.

शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने अवैध फलकांबाबत कडक शब्दांत समज देत आदेश दिले होते. अवैध फलकांवर कारवाई करणाऱ्या महापालिकांचे ग्रामपंचायतीत रुपांतर करण्याच्या इशाऱ्यासह न्यायालयाने अवैध फलक लावणाऱ्यांना नेत्यांना दंडही ठोठावला. न्यायालयाच्या कडक धोरणानंतर मध्यंतरी महापालिका प्रशासनाने अवैध फलक काढून टाकले. मात्र, पुन्हा मनपाचा अतिक्रमण विभाग थंडावला आहे. सत्ताधारी असलेल्या असलेल्या पक्षाच्या महानगर ग्रामीण जिल्हा भाजपकडून शहरात ठिकठिकाणी स्थापना दिन खासदार गांधी यांच्या अभिनंदनाचे बेकायदेशीर फलक लावण्यात आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून दिल्ली दरवाजा, बाजारपेठेतील प्रमुख चौकांत हे फलक दिमाखात मिरवत आहेत. मात्र, या फलकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.