आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटबंधारे'च्या व्याजदरात १% कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या कर्जाचा व्याजदर १२ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर करण्याचा, तसेच साध्या कर्जाची मर्यादा लाखांवरून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण काळे यांनी दिली.
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्याजदर कमी करण्याचे तसेच कर्जमर्यादा वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत सभासदांना दिलासा देणारा निर्णय घेऊन अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. महागाईच्या पार्श्वभूमीवर सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेने हा निर्णय घेतला. घरबांधणी, दुरुस्ती, पाल्यांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आदींसाठी सभासदांना संस्थेच्या निर्णयाचा फायदा घेता येणार आहे. संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन कर्जावरील व्याजदर भविष्यात निश्चित करण्यात येणार अाहे. सभासद कल्याण निधीतून रक्कम देण्याचा विचार करू, असे अध्यक्ष काळे संचालक सर्जेराव ठोंबरे यांनी म्हटले आहे. संस्थेकडे सध्या १३ कोटींचे स्वभांडवल आहे. ३१ कोटींच्या कायम ठेवी मुदत ठेवी आहेत. ५३ वर्षांपासून लेखापरीक्षणात वर्ग दर्जा राखणाऱ्या संस्थेने सभासदांना ८० कोटींचे कर्जवाटप केले आहे. शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार तसेच बँको पुरस्कारानेही संस्थेचा गौरव करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पाटबंधारेसार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या कर्जाचा व्याजदर १२ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर करण्याचा, तसेच साध्या कर्जाची मर्यादा लाखांवरून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण काळे यांनी दिली.

बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्याजदर कमी करण्याचे तसेच कर्जमर्यादा वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत सभासदांना दिलासा देणारा निर्णय घेऊन अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. महागाईच्या पार्श्वभूमीवर सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेने हा निर्णय घेतला. घरबांधणी, दुरुस्ती, पाल्यांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आदींसाठी सभासदांना संस्थेच्या निर्णयाचा फायदा घेता येणार आहे. संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन कर्जावरील व्याजदर भविष्यात निश्चित करण्यात येणार अाहे. सभासद कल्याण निधीतून रक्कम देण्याचा विचार करू, असे अध्यक्ष काळे संचालक सर्जेराव ठोंबरे यांनी म्हटले आहे. संस्थेकडे सध्या १३ कोटींचे स्वभांडवल आहे. ३१ कोटींच्या कायम ठेवी मुदत ठेवी आहेत. ५३ वर्षांपासून लेखापरीक्षणात वर्ग दर्जा राखणाऱ्या संस्थेने सभासदांना ८० कोटींचे कर्जवाटप केले आहे. शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार तसेच बँको पुरस्कारानेही संस्थेचा गौरव करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना कर्जाचे धनादेश वितरित करताना पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण काळे. समवेत संचालक सर्जेराव ठाेंबरे, सुनील कर्डिले, शोभा सोनवणे आदी.
बातम्या आणखी आहेत...