आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-याला इसीस या अतिरेकी संघटनेने मागितली २५ लाख खंडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेने गुरुवारी नगर जिल्ह्यातील सुगाव बुद्रुक (ता. अकोले)
येथील बाबाराजे भाऊसाहेब देशमुख यांच्या नावे चिठ्ठी पाठवून २५ लाखांची खंडणी मागितली. २७ जानेवारीपर्यंत रक्कम न दिल्यास देशमुख कुटुंबीयांसह गावच बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकीही दिली.

गुरुवारी दुपारी देशमुख यांना आपल्या निवासस्थानाच्या पोर्चमध्ये ही चिठ्ठी सापडली. त्यांचा बंगला कोल्हार - घोटी राज्यमार्गालगत शिवारात आहे. चिठ्ठीत नातेवाइकांसह त्यांची शेतजमीन किती व कोठे आहे, विहिरी किती व कोठे आहेत, याचाही उल्लेख आहे. ‘तुमच्या विहिरीशेजारी पाइपमध्ये २५ लाख ठेवावेत. आमची माणसे ती रक्कम घेऊन जातील. पोलिसांना माहिती देऊ नये’, असे चिठ्ठीत नमूद केले आहे. कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केलेला असावा, असे पोलिसांना वाटते. ‘आम्ही सर्व बाजूने कसून चौकशी करीत आहोत,’ असे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी बाबाराजे देशमुख यांच्याकडे आठ ते दहा एकर बागायती जमीन आहे. यात तीन विहिरी आहेत. या शेतातच बंगला बांधून ते कुटुंबियांसह राहतात.