आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Bogus Water Pipe Line In Nagar Municipal Corporation

अनधिकृत नळजोड प्रशासनाच्या रडारवर... पाणीचोरांना आळा आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातीलअनधिकृत नळजोडधारक सध्या महापालिकेच्या रडारवर आहेत. पाणीपुरवठा विभागाने शेंडी परिसरात मुख्य जलवाहिनीवरील ११ नळजोड तोडले आहेत. शहर उपनगरातही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी बुुधवारी सांगितले. त्यामुळे अनधिकृत नळजोडधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मालमत्तांची संख्या सव्वालाखाच्या पुढे गेली असताना महापालिकेकडे मात्र केवळ ९६ हजार मालमत्तांचीच नोंद आहे. विशेष म्हणजे ९२ हजार मालमत्ता असताना अधिकृत नळजोडांची संख्या मात्र ४६ हजार एवढीच आहे. त्यामुळे शहरात हजारो नळजोड अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते. एकट्या झेंडीगेट विभागात पाच हजार अनधिकृत नळजोड असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेच्याच कर्मचाऱ्याने आयुक्तांना काही दिवसांपूर्वी सादर केले होते. या बोगस नळजोडांकडे मनपाने अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले. त्यामुळे मनपाचे पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. मालमत्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, परंतु अधिकृत नळजोडांची संख्या आहे तेवढीच आहे. बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मालमत्ताधारक अनधिकृतपणे नळजोडणी करतात. कोणतीही परवानगी घेता पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून परस्पर नळजोड घेण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून शहरात राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे झेंडीगेटसह केडगाव, मुकुंदनगर, बोल्हेगाव सावेडी या उपनगरांमध्ये अनधिकृत नळजोडधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
याप्रकरणी उपायुक्त अजय चारठाणकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अनधिकृत नळजोड तोडण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. शेंडी परिसरात मुख्य जलवाहिनीवर असलेले ११ अनधिकृत नळजोड पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोडले. शहर उपनगरातील विविध भागात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त चारठाणकर यांनी दिली. त्यामुळे अनधिकृत नळजोडधारकांचे धाबे दणाणले आहेत.

खिसे भरू उद्योग
मनपाच्यामाहिती सुविधा केंद्रात मिळणारा अर्ज पाचशे रुपये फी भरल्यानंतर कर्मचारी नळजोडाच्या ठिकाणाची पाहणी करतात. शंभर रुपयांचे दोन स्टॅम्प, घरपट्टी भरल्याची पावती दीड हजार रुपये अनामत भरल्यानंतर नळजोड मिळतो. हे सोपस्कार करण्यापेक्षा कर्मचाऱ्याला हाताशी धरून कोणतीही परवानगी शुल्क भरता नळजोड घेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. स्वत:चे खिसे भरण्यासाठीच मनपा कर्मचारी हे उद्योग करत आहेत.

पुरेसे पाणी नाहीच
शहरालादररोज ८० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ ५५ ते ५८ दशलक्ष लिटर पाणी मिळते. अनधिकृत नळजोडांची संख्या वाढत असल्याने नियमितपणे पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे टंचाईला तोंड द्यावे असून आता पाणीपट्टी भरायची की नाही, असा प्रश्न नळजोडधारकांना पडला आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार
शहरातीलप्रभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एखाद्या व्यक्तीने अनधिकृत नळजोड घेतला असेल, तर त्याच्यावर महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ चे कलम (ब) भारतीय दंड संहिता ३७९ नुसार कारवाई करण्याचे अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांना कारवाई करणे शक्य होत नाही. केवळ मार्चअखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून तुटपुंज्या स्वरूपाची कारवाई करण्यात येते. त्यामुळे शहरातील अनधिकृत नळजोडांची पाणी चोरांची सातत्याने संख्या वाढत आहे.
९६ मालमत्ता संख्या
४६ हजार अधिकृत नळजोड
३० हजारपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड