आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही : कर्डिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अमेरिकन मराठी मिशनची जागा कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पुढील आठवड्यात वेळ घेतल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी गुरूवारी पत्रकाद्वारे दिली.

मराठी मिशनच्या स्टेशन रस्त्यावरील मोक्याच्या क्लेरा ब्रूस शाळेच्या २५ एकर जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही संबंधित बिल्डरकडून दादागिरी सुरू असल्याची तक्रार करत ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार कर्डिले यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यांसदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता त्यांनी चर्चेसाठी पुढील आठवड्यात वेळ दिला असल्याची माहिती कर्डिले यांनी पत्रकाद्वारे दिली. ही जागा कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने दादागिरी करत काही बिल्डर मिशनची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल. गोरगरीब ख्रिस्ती समाजावर अन्याय होऊ देणार नाही. या समाजाच्या पाठीशी कोणीही नाही, असा गैरसमज करून घेऊ नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीतून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आमदार कर्डिले यांनी व्यक्त केली.