आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा बांधकाम करणाऱ्या गाळेधारकांविरुद्ध कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील फुले सेंट्रल फुले मार्केटमधील सर्व गाळेधारकांची मुदत संपलेली अाहे. त्यामुळे सगळेच गाळेधारक बेकायदा अाहेत. मार्केटमध्ये अनेक गाळेधारकांनी पािलकेची परवानगी घेता बेकायदा बांधकाम केलेले अाहे. त्यामुळे गाळेधारकांना वेगवेगळा न्याय लावता सगळ्याच गाळेधारकांवर कारवाई करण्याचा ठराव महासभेत करण्यात अाला. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला अाहे.
महापालिकेत बुधवारी महापौर राखी साेनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. सभेत स्वच्छतागृहांचे गाळ्यांत रुपांतर केल्याचा विषय गाजला. स्वच्छतागृहांचे गाळ्यात रुपांतर झाल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपने केली. परंतु फक्त चार जणांवर कारवाई करण्यापेक्षा सगळेच गाळेधारक हे बेकायदा भाेगवटाधारक अाहेत. सगळ्यांवर समान कारवाई करावी, अशी भूमिका खाविअाने घेतली. गाळ्यांमध्ये भाेगवटाधारकांनी अनधिकृत बांधकाम करून बदल केले अाहेत. त्याविरुद्ध प्रशासनाने कारवाईचे अादेश दिले.

फुले सेंट्रल फुले मार्केटमधील चार दुकानांवर कारवाईचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला हाेता. भाजप गटनेते डाॅ. अश्विन साेनवणे यांनी असा गंभीर प्रकार झालाच कसा? या मागील खऱ्या सूत्रधारांचा शाेध घ्यावा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यात अार्थिक व्यवहाराचा संशयही व्यक्त केला. तसेच प्रशासनाच्या प्रस्तावानुसार कारवाईची मागणी केली. मात्र, खाविअाचे नितीन लढ्ढा यांनी प्रशासनाच्या प्रस्तावावर अनधिकृत बांधकामाला पाठिंबा नसला तरी केवळ चार जणांवर कारवाई करणे उचित नसल्याची भूमिका मांडली. मार्केटमध्ये अाणखी काही गाळे असेच असण्याची शक्यता अाहे. तसेच संपूर्ण मार्केटमधील गाळेधारकच अाता अनधिकृत अाहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली. सगळ्यांना समान न्याय लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

घनकचऱ्यावरूनधारेवर धरले
घनकचराप्रकल्प सुरू केला जात नाही. मशिनरी चाेरीला जातेय. कचरा साचताेय, अशी तक्रार अश्विन साेनवणेंनी केली. उपायुक्त प्रदीप जगताप यांनी अायुक्तांची लवादक म्हणून नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

नगरसेवकांनीही फाेन करू नये
नेहमीप्रमाणेमहासभेत अतिक्रमणाच्या विषयावरही चर्चा झाली. रस्त्यांवर पूर्वीच्या तुलनेत अतिक्रमण वाढले अाहे. घरापासून चारचाकीत येणे शक्य हाेत नसल्याची खंत व्यक्त केली. चेहरे पाहून कारवाई करू नये, अशी मागणी केली. तर अनंत जाेशी यांनी तर प्रशासनाला ठाेस कारवाई करू द्यावी. अधिकारी पदाधिकारी नगरसेवकांनी कारवाई राेखण्यासाठी पथकाला फाेन करू नये. अापणही थाेडा संयम ठेवण्याचे अावाहन केले. अमर जैन यांनी प्रशासन काम करत नसल्याचा टाेला लगावला.

भाजप- खाविअात चकमक
भाजपचार दुकानदारांवर कारवाईसाठी अाग्रही असताना खाविअाने मात्र वेगवेगळा न्याय करण्यास विराेध दर्शवला. यादरम्यान डाॅ. साेनवणे नितीन लढ्ढा तसेच कैलास साेनवणे यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. ठरावीक लाेकांवर कारवाई करता सगळ्यांनाच बेकायदेशीर ठरवावे, यावरून भाजप खाविअा नेहमीप्रमाणे समाेरासमाेर अाले हाेते. नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी प्रशासनाने महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
महापालिकेत बुधवारी महासभेला नगरसेविकांशेजारी एक लहान मुलगी बसली होती. सभेत तिने राजकारणाचे धडे गिरवले. पण सभागृहात लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त दुसऱ्या कुण्या व्यक्तीला बसण्यास मनाई आहे. गेल्या वेळच्या सभेच्या वेळी सभागृहात सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील हे दाखल झाले होते. या प्रकारामुळे महासभेचा एकप्रकारे पोरखेळच झालेला आहे. त्यामुळे प्रशासन हा प्रकार थांबवेल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...