आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव- राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळून किमान वेतन राहणीमान भत्ता मिळावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या जुलैला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील घरासमोर मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.

शेवगाव येथे पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सुमारे १५० ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस अॅड. सुधीर टोकेकर, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, भगवान गायकवाड, संतोष लहासे, काकासाहेब निजवे, अशोक वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

लांडे म्हणाले, शासनाच्या आकृतिबंधातील सर्व ग्रामपंचायतींकडून कर्मचाऱ्यांना किमान वेतन राहणीमान भत्ता देण्यात यावा, सेवापुस्तक भरून भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडणे, जिल्हा परिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचे सर्व नियम लावणे, १० टक्के नोकर भरतीसाठी १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी करणे या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेकदा आंदोलने करूनदेखील शासन, तसेच ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत दुर्लक्ष केले. संघटनेने अनेकदा शासनाशी चर्चा करण्यासाठी बैठकीची मागणी करूनही चालढकल करण्याच्या शासनाच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या धोरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी जुलैला परळी येथे संघटनेतर्फे मुक्कामी आंदोलन करण्यात येणार असल्याचे लांडे यांनी यावेळी जाहीर केले.
बातम्या आणखी आहेत...