आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Illegal Religious Building In Solapur

सुशीलनगरातील मदरसा हटवण्यासाठी ब्रेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील ७३ अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेत मंगळवारी जोडभावी आणि विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिकस्थळे हटवण्यात आली.

विजापूर रोडवरील सुशीलनगरातील मदरसा हटवण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले. ते मंगळवारीही सुरू होते. दोन मजली इमारत दाट लोकवस्तीत असल्याने ती काढण्यासाठी अडचण येत आहे. चार ब्रेकरच्या सहाय्याने ते हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बुरूज काढण्यासाठी दोरीचा वापर करण्यात आला. यावेळी मनपा झोन अधिकारी नीलकंठ मठपती, सहाय्यक पोलिस आयुक्त महिपती इंदलकरसह मनपा अधिकारी आणि पोलिस उपस्थित होते.आरटीओ कार्यालयातील दत्त मंदिर काढण्यात आले. येथील जबाबदार व्यक्तीने मूर्ती घेण्यास नकार दिल्यानंतर पूजा करून मूर्ती मनपाच्या ताब्यात घेण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने दिवसभर मंदिर हटवण्याचे काम सुरू होते. सायंकाळी चार वाजता काम संपले. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मोहन कांबळे, नजीर शेख उपस्थित हाेते.