आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबर हिटमध्ये लोहशेडिंगचा झटका,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नागरिकांना कोणतीही माहिती न देता महावितरणने शहराच्या विविध भागात ते तासांचे भारनियमन सुरू केले आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा केव्हा सुरू होईल, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने भारनियमनाचा खेळ मांडल्याने नागरिक संतापले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या दालनातील पंखे ट्यूब बंद करून ऑक्टोबर हिटचा झटका काय अाहे, याची जाणीव करून कंदील दाखवले.

दसरा, दिवाळी मोहरम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले अाहेत. नवरात्रोत्सव शहरात साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना देता भारनियमन सुरू करून नगरकरांना वेठीस धरले आहे. विविध भागात ते तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेतच, शिवाय लहान-मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. आमदार जगताप यांनी नगरकरांची गैरसोय ओळखून महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारनियमनाबाबत जाब विचारला. कार्यकर्त्यांसह त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडून कार्यालयातील ट्यूब पंखे बंद करत अधिकाऱ्यांना ऑक्टोबर हिटची जाणीव करून दिली.

शहरात भारनियमन सुरू असताना महावितरण कार्यालयात विजेचा झगमगाट सुरू असल्याचे आंदोलकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना कार्यालयात घेराव घालून कोंडले. त्यानंतर सर्व ट्यूबलाईट, एसी, पंखे बंद करून कंदील मेणबत्त्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर लावल्या. अधीक्षक अभियंता कोळी यांनी नवरात्र, मोहरम दिवाळी सणाच्या काळात कोणतेही भारनियमन केले जाणार नाही, असे लेखी आश्वासन जगताप यांना दिले. शहरातील सर्व फीडरवरील वीजबिलाची वसुली, चोरी पकडण्याची मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासकीय कार्यालये ठप्प
ग्रामीणविकासाची जबाबदारी सांभाळणारी जिल्हा परिषद संगणकीकृत झाली आहे. गतिमान प्रशासनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आग्रही आहेत. पण मुख्यालयातच चार-पाच तासांहून अधिक वेळ बत्ती गुल होत असल्याने गतिमान प्रशासनाला ब्रेक लागला आहे. नगर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने इतर सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
या वेळी महावितरणच्या कार्यालयातील दिवे पंखे बंद करून टेबलवर मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. उकाडा म्हणजे काय असतो, याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली.

प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय
महावितरणनेफीडरनिहाय भारनियमनाची पद्धत सुरू केली असली, तरी मूठभर थकबाकीदारांमुळे प्रामाणिकपणे ग्राहकांना भारनियमनाला तोंड द्यावे लागते. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा नगरकरांकडून निषेध केला जात आहे. वेळेत बिल भरणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत भारनियमनाचा फटका बसू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.