आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनवमी मिरवणूक; तोफखान्यात गुन्हा, साठ जणांसह अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीरामनवमी निमित्त हिंदू राष्ट्र सेना भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी शहरातून अनधिकृत मिरवणूक काढली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी साठ जणांसह अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा नोंदवला.

हिंदू राष्ट्र सेनेने या मिरवणुकीचे आयोजन केले होते. हिंदू राष्ट्र सेनेला परवानगी नाकारल्यानंतर साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. पण परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी महसूल खात्याकडे परवानगीसाठी अर्ज केला. पण गेल्या वर्षी रामनवमीच्या मिरवणुकीत दंगल झालेली पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनी पोलिसांचा अहवाल मागवला. त्यामुळे तहसीलदारांनीही मिरवणुकीला परवानगी नाकारली. तरीही शहरातून श्रीरामनवमीची मिरवणुक निघाली. आडतेबाजार येथून दुपारी मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेच्या सुमारास चौपाटी कारंजा येथे मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रकरणी शनिवारी दुपारी तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गणेश झिंजे, सागर ठोंबरे, मयूर सतीश मैड, करण डापसे, सागर डोंगरे, सागर डुमारे, ध्वनिक्षेपक चालक दुर्वेश गाडेकर, जितेंद्र डापसे यांच्यासह सुमारे ६० जणांहून अधिक जणांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यासह इतर कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...