आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशासनाला शिंगणापूरचे टेन्शन, पुरोगामी-हिंदुत्ववादी येणार आमने-सामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुरोगामी संघटना आणि भूमाता रणरागिणी ब्रिगेडतर्फे २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर प्रवेशाचे आंदोलन केले जाणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या इशाऱ्याला धर्मद्रोही म्हणत विरोध दर्शवला आहे. पुरोगामी संघटना भूमाता ब्रिगेडने हा प्रकार थांबवला नाही, तर राज्यभरातून एकत्र येत हे आंदोलन चिरडून काढतील, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. प्रजासत्ताकदिनी या सर्व संघटना आमनेसामने उभ्या ठाकणार असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
शनिमूर्तीच्या चौथऱ्यावर पुरोगामी, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड संघटना ४०० महिलांना घेऊन प्रवेश करणार आहेत. भूमाता ब्रिगेडवर पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र येत भूमाता रणरागिणी ब्रिगेडचे आंदोलन हाणून पाडू, असा खणखणीत इशारा शिवसेनेच्या माजी महापौर शीला शिंदे यांनी दिला आहे.

या आंदोलनात माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे नरेंद्र कुलकर्णी, अरुणा गोयल, अनिता राठोड, वारकरी संप्रदायाच्या प्रभाताई भोंग, पुरोहित महासंघाचे बाळकृष्ण महाराज पंढरपूरकर, अखिल भारतीय बहुभाषिक महासंघाचे पंडित विजय मिश्रा, पुरोहित वैभव मुळे, दत्तात्रय खिस्ती, किशोर जोशी, मिलिंद धर्माधिकारी सहभागी होणार आहेत.

अतिरिक्त बंदोबस्त तैनात
ऐनप्रजासत्ताकदिनी पुरोगामी संघटना भूमाता रणरागिणी ब्रिगेडने आंदोलनाची हाक दिली आहे, तर हिंदुत्ववादी संघटनांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. मागील वेळी भूमाता ब्रिगेडने आंदोलन केले, तेव्हा देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल झाला होता. या वेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनही कामाला लागले आहे. काही दिवस शनी शिंगणापुरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे.
अध्यक्षांचाही विरोध
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची नेमणूक नुकतीच झाली. दोन महिला या वेळी प्रथमच नियुक्त करण्यात आल्या. मागील ५२ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच महिलेची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हा मान अनिता शिंदे यांना मिळाला. निवडीनंतर जाहीर सभेत बोलताना शनिमंदिरातील रूढी-परंपरा यापुढेही जपल्या जातील. येथे महिला-पुरुषांना चौथऱ्याखालूनच दर्शन घेण्याचा नियम आहे. महिलांना चौथऱ्यावरून दर्शन खुले केले जाणार नाही, असे शेटे यांनी सांगितले. त्यामुळे देवस्थानची भूमिकाही आंदोलकांच्या विरोधातच आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, छावा संघटनेचा इशारा...