आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनैश्वराला सुरक्षेचे कडे, भूमाता ब्रिगेडची शनिपूजेची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर येथील चाैथऱ्यावर चढून शनीचे दर्शन घेण्याचा इशारा भूमाता रणरागिणी ब्रिगेडने दिला अाहे. प्रथेविरुद्ध हाेणाऱ्या या कृतीला स्थानिक गावकरी व महिलांनी तीव्र विराेध केला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाेलिसांनीही त्यांना राेखण्यासाठी चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात केला अाहे. दुसरीकडे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याच्या भूमिकेवर ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ठाम आहेत. दरम्यान, देसाई यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून हेलिकाॅप्टरने दर्शन घेण्याची परवानगी मागितली अाहे, मात्र प्रशासनाने तीही नाकारली अाहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंगणापुरात हाेणाऱ्या अांदाेलनाकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले अाहे.
काही दिवसांपूर्वी एका युवतीने शनी शिंगणापुरात चाैथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले हाेते. तेव्हापासून या वाद उद््वला अाहे. दरम्यान, पुण्यातील भूमाता रणरागिणी ब्रिगेडने शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचे जन आंदोलन हाती घेतले असून त्यासाठी २६ जानेवारी राेजी शिंगणापुरात धडक देण्याचा इशाराही दिला अाहे. त्याला देवस्थानसह विविध महिला संघटनांनी विरोध दर्शविला आहे. आंदोलक महिलांना आपल्या स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. तर महिलांना समान हक्क असल्यामुळे आंदोलन करण्याच्या निर्णयावर तृप्ती देसाई ठाम आहेत. ‘आपल्याला जबरदस्तीने अडवण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधितांना गुलाबपुष्प देण्यात येईल’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला अाहे.
वीस फुटांवरून दर्शन :
२६ जानेवारीनिमित्त गर्दी, अांदाेलनाचा इशारा यामुळे पाेलिसांनी चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात केला अाहे. शनी चाैथऱ्याजवळ १५ फूट उंचीचे बॅरिकेड्स लावून सुमारे २० फूट अंतरावरून दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच २५० पाेलिस, देवस्थानच्या ५० ते ६० महिला सुरक्षा रक्षक तैनात केले अाहेत.
हेलिकॉप्टरला नकार
भूमाता ब्रिगेडने हेलिकॉप्टर वापराची परवानगी मागितल्याचे सांगितले जात असले तरी त्यासाठी पोलिसांना योग्य ती शहानिशा करावी लागते. त्यामुळे परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. आंदोलन न करण्यासाठी देसाई यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो निष्फळ ठरला. तरीही आंदोलक व नागरिकांनीही सद्सद‌्विवेकबुद्धीने विचार करून पाेलिस प्रशासनाला सहकार्य करावे.
सौरभ त्रिपाठी, पोलिस अधीक्षक, नगर