आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामोपचाराचा अभिषेक, महिला प्रवेशाला मुख्यमंत्री अनुकूल, तोडग्यासाठी चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर/ पुणे/ नवी दिल्ली- प्रजासत्ताकदिनी शनिशिंगणापुरातील शनि चौथऱ्यावर प्रवेशाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शनि चौथऱ्यावरील महिला प्रवेशावरील बंदी उठवावी आणि शनिशिंगणापुरात येऊन सपत्नीक पूजा करावी, असे साकडे घातले. मंगळवारी चौथऱ्यावर महिला प्रवेशाला टि्वट करून अनुकूलता दर्शवली होती. या वादावर सरकार मध्यस्थी करू शकते, असे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
मंगळवारी चौथऱ्यावर प्रवेशासाठी निघालेल्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या सुमारे ५०० महिला आंदोलकांना पोलिसांनी सुप्याजवळ म्हणजे तब्बल ७५ किलोमीटर अलीकडेच रोखले आणि आंदोलकांना माघारी परतण्यास भाग पाडले. दरम्यान, याप्रकरणी दाखल याचिकेवर काेणतेही निर्देश देण्यास अाैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र बाेर्डे अाणि अायएएस चिमा यांनी नकार दिला. १६ फेब्रुवारीला याचिकेवर पुढील सुनावणी हाेणार अाहे.

या आंदोलकांनी बुधवारी पुण्यात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शनि चौथऱ्यावर महिला प्रवेशााबाबत अनुकुलता दाखवली होती. त्यांनी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही मात्र आमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. महिलांना शनि चौथऱ्यावरील प्रवेश बंदीबाबत शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांनी मार्ग काढावा. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म महिलांना पूजेचा अधिकार देतो. कालबाह्य परंपरा बदलणे ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. पूजेसाठी भेदाभेद करणे ही आपली संस्कृती नाही. मंदिर प्रश्नाने चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा, असे मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनी म्हटले होते.
ग्रामसभेत निषेधाचा ठराव
शनिशिंगणापुरात बुधवारी ग्रामसभेत वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भूमाता ब्रिगेडच्या निषेधाचा ठराव मंजूर झाला.

महिलांना बंदी हा स्त्री-पुरुष समानतेचा व संवैधानिक अधिकाराचा अपमान आहे.आम्हाला रोखले तरी आम्ही शनिचे दर्शन तर घेणारच आहोत.
- तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता रणरागिणी

दोन तासांत ६००० ट्विट : या आंदोलनाला सोशल मीडियावर माेठा प्रतिसाद मिळाला. ट्विटवर #ShaniShingnapur या हॅशटॅगवर अवघ्या दोनच तासांत तब्बल ६००० ट्विट झाले आणि महिला प्रवेश बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आखाडा परिषदेचे मत...
- शनिधामचे दाती मदन महाराज म्हणतात, प्रवेश नाही, ते मंदिर नव्हे